पुणे महाराष्ट्र

नेत्यानं बंगल्यावर नेऊन मारहाण केली; मनोरुग्ण-निराधार लोकांची सेवा करणाऱ्या अक्षय बोऱ्हाडेचा आरोप

पुणे | मनोरुग्ण, गरीब तसेच निराधार लोकांसाठी काम करणाऱ्या शिवऋण प्रतिष्ठानच्या अक्षय बोऱ्हाडे नामक तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. जुन्नरच्या विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी ही मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सत्यशील शेरकर यांनी मला त्यांच्या बंगल्यावर नेलं आणि काठीच्या सहाय्याने मारहाण केली. मी पळण्याचा प्रयत्न केला असता बंदूक घेऊन माझ्या मागे लागले आणि मला जीवे मारण्याची धमकी दिली. मला पकडून स्वतःच्या पाया पडयला लावलं तसेच जमीन चाटायला लावली आणि माझ्या पाठीवर तीन काठ्या फोडल्या, असं अक्षय बोऱ्हाडेनं आपल्या फेसबुक लाईव्हमध्ये म्हटलं आहे.

मला पकडून माझं खोटं शुटिंग काढण्यात आलं. मी जे हो म्हणाले त्याला हो म्हण असं मला धमकावण्यात आलं. पैशाचा व्यवहार असल्याचं तुम्हाला सांगितलं जाईल, मात्र असा कोणताही व्यवहार नाही, असं अक्षयनं म्हटलं आहे.

दरम्यान, माझं खोटं वाटत असेल तर शेरकर यांच्या बंगल्यावरील सीसीटीव्ही फुटेज चेक करा. ते कसे बंदूक घेऊन माझ्या पाठीमागे पळत होते, हे सगळ्यांना दिसेल. गरीबाचं पोरगं वर चाललेलं यांना पहावत नाही. जो त्यांच्यापुढे जाणार, त्यांच्यापेक्षा चांगलं काम करणार यांना ते मारहाणच करणार. एवढंच नाही तर आजपासून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल व्हायला सुरुवात होईल, असंही त्याने म्हटलं आहे.

पाहा व्हिडीओ-

ट्रेंडिंग बातम्या-

कोरोनापासून बचाव करण्यासाठी ‘या’ 2 गोष्टी सातत्याने करा; आरोग्य मंत्रालयाची नागरिकांना सूचना

मातोश्रीची पायरी का चढलो?; शरद पवार यांनी सांगितलं कारण

महत्वाच्या बातम्या-

दिलदार शेतकरी! आपल्या शेतात काम करणाऱ्या मजुरांना घरी जाण्यासाठी विमानाची तिकीटं दिली काढून

राज्यात आज कोरोनाचे किती रुग्ण वाढले?; पाहा तुमच्या भागात किती?

“सरकारच्या फेकाफेकीचा पर्दाफाश आम्हाला करावाच लागेल”

आमदार रोहित पवार यांचं धाडस; पीपीई किट घालून पोहोचले रुग्णालयात

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या