बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुढचे 5 दिवस महत्त्वाचे; ‘या’ भागांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी

मुंबई |  जुन महिन्यात दडून बसलेला पाऊस (Rain) जुलैमध्ये अखेर सुरू झाला. जून महिन्यात पाऊस कधी येणार कधी येणार म्हणत असताना जुलै महिन्यात मात्र मुसंडीच मारली आहे. पावसाची सध्या जोरदार बॅटिग सुरू आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील 5 दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

7 जुलैपर्यंत पुणे शहर आणि परिसरात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने जारी केला आहे. काही जिल्ह्यात अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. मुंबईत (Mumbai) आज पुन्हा पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबईतील उपनगरात ठाणे, परळ, सायन दादर या भागात ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला.

मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, नंदुरबार आणि दक्षिण महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील घाट क्षेत्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील परभणी,नांदेड, औरंगाबाद(संभाजीनगर), व काही जिल्हियातील भागात मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

पावसाच्या आगमनामुळे पाणी संकट टळलं. शेतकऱ्याच्या शेती कामे खोळंबली आहेत.एनडीआरएफ(NDRF) ची टीम राज्यात दाखल झाली आहे. राज्यातील प्रशासन तयारीला लागले आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.  संभाव्य धोका लक्षात घेता नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

थोडक्यात बातम्या

शिंदे सरकारच्या खातेवाटपाबाबत देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले…

‘मिस इंडिया 2022’ ठरलेल्या सिनी शेट्टीबद्दल जाणून घ्या सर्व काही

पावसाळ्यात ‘या’ सोप्या घरगुती उपायांसोबत घ्या तुमच्या त्वेचेची काळजी

‘काय ती शायरी, काय ती अदाकारी…’, चित्रा वाघ यांचा राऊतांना शहाजी बापू स्टाईल टोला

‘काली’ चित्रपट प्रकरणी भारतीय उच्चायुक्तालयाचा निर्मात्यांना दणका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More