बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…आता मंत्रालयाला त्यांच्या साड्यांची बिलं भरावी लागणार नाही”

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्ममधील पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला. मोदींच्या मंत्रिमंडळात 43 नेत्यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अनेक मंत्र्यांना पदमुक्त करण्यात आलं तर नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली. अशाच प्रकारे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडील वस्त्रोद्योग मंत्रालय काढण्यात आलं. आता त्यांच्याकडे फक्त महिला व बाल विकास मंत्रालय शिल्लक आहे. यावरून काँग्रेस प्रवक्त्या अलका लांबा यांनी टीका केली आहे.

आता स्मृती इराणी आपले संपूर्ण लक्ष महिला व बालविकासावर केंद्रित करू शकतील आणि वस्त्रोद्योग मंत्रालयाला त्यांच्या साड्यांची बिलं भरण्याची गरज भासणार नाही, अशा खोचक शब्दात अलका लांबा यांनी इराणींवर टीकास्त्र सोडलं आहे. यासंदर्भात त्यांंनी ट्विट केलं आहे.

मोदी मंत्रिमंडळात रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी आश्विनी वैष्णव यांच्याकडे सोपवली आहे तर पीयुष गोयल यांच्याकडे आता केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाचाही कारभार सोपवण्यात आला आहे.

दरम्यान, मंत्रिमंडळात केलेल्या बदलावरून विरोधी पक्षाने सरकारवर टीका केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिलेला राजीनाम्यावरून महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. हर्षवर्धन यांचा राजीनामा घेण्याऐवजी स्वतः नरेंद्र मोदींनी राजीनामा द्यायला हवा होता, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

‘मी काय ईडीचा प्रवक्ता नाही’; खडसेंच्या ईडी चौकशीवर फडणवीसांचं मोठं वक्तव्य

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींवर नवीन पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी म्हणाले…

शाब्बास पुणेकरांनो! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्याने अखेर करुन दाखवलं, वाचा आजची आकडेवारी

“नागपूरचा विकास पहिल्या पावसात भिजून गेला”

“केंद्रातील मंत्रीच नाही तर पंतप्रधान मोदींनाही बदलण्याची गरज”

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More