बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजपसह सर्वच पक्षांनी धनगर आरक्षणाचा ‘खेळ’ केला- राम शिंदे

पुणे | राज्यात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. अशातच धनगर आरक्षणाचा  प्रश्न ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते राम शिंदे यांनी सर्व पक्षांवर निशाणा साधला आहे.

विरोधात असलं प्रत्येकजण धनगर आरक्षण देऊ म्हणतो. पण सत्तेत आल्यानंतर त्यावर कुणी बोलायला तयार होत नाही. परिणामी आरक्षणाचा प्रश्न जिथे आहे तिथेच राहतो. काँग्रेस, भाजपसह सर्वच पक्षांनी धनगर आरक्षणाचा खेळ केला असल्याचं राम शिंदे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, प्रत्येकाने वैयक्तिक स्वार्थ आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन आरक्षणाकडे पाहायला हवं, शिंदे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणाऱ्या लोकांची तोंडं काळी झाली- रूपाली पाटील

संभाजी ब्रिगेडच्या महाराष्ट्र राज्य संघटक पदी प्रदिप कणसे यांची निवड

सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवणाऱ्यांच्या कानफटात बसली- किशोरी पेडणेकर

‘रोह्याला चौदा वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार तेव्हा ठाकरे सरकार झोपलं होतं का?’; भाजपची टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More