बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राज ठाकरेंचा सगळा सिझनेबल कार्यक्रम, ते ऋतूप्रमाणे बदलणारे नेते”

मुंबई | गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. त्यामुळे सध्या राज्यातील राजकीय वातावरण जोरदार पेटलं आहे. अशातच आता शिवसेना-मनसे (Shivsena, MNS) वाद शिगेला पोहचला आहे.

राज ठाकरेंनी भर सभेत महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांला चांगलंच लक्ष केलं होतं. यावर आता शिवसेना नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्याप्रमाणे पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा हे तीन ऋतू आहेत. त्याप्रमाणे राज ठाकरे हे त्या तीन ऋतूप्रमाणे बदलणारे नेते आहेत, असा खोटक टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे.

राज ठाकरे यांचा हा सगळा सिझनेबल कार्यक्रम आहे. कोणत्याच ऋतूत त्यांना काहीच मिळत नाही. पावसाळ्यात पाणी पडत नाही, उन्हाळ्यात ऊन पडत नाही, तसेच हिवाळ्यात थंडी वाजत नाही, अशा तिखट शब्दांत गुलाबराव पाटलांनी निशाणा साधला आहे.

दरम्यान, राज ठाकरेंच्या वादळी सभेचे पडसाद अद्यापही पडत आहेत. राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत असून राज ठाकरेंना चांगलंच धारेवर धरलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

“लग्न एकासोबत केलं आणि संसार दुसऱ्यासोबत, हे चांगलं नाही”

मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख रुग्णालयात दाखल

सोने-चांदीच्या दरात पुन्हा मोठी घसरण, पाहा आजचे दर

मोठी बातमी! नवाब मलिकांना मोठा झटका, तुरुंगातील मुक्काम वाढला

Sujay Vikhe: “… तर मग आम्ही एका मिनिटात पलटी मारू”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More