मुंबई | राज्यातील मंदिर खुली करून देण्यासाठी भाजपकडून आंदोलनं छेडण्यात आली होती. अखेर सोमवार म्हणजेच पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळं उघडण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलंय.
यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “राज्यातील जनतेने कोरोनाच्या काळात शिस्तीचं पालन केल्याने इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही. होळी, गणेशोत्सव, नवरात्र, पंढरीची वारीही झाली नाही. इतकंच नाही तर इतर धर्मीयांनीही ईद, माऊंट मेरीसारख्या जत्रांसंदर्भात शिस्त पाळली. त्यामुळे आता धार्मिक स्थळं उघडल्यानंतर ही शिस्त पाळा.”
दरम्यान मंदिरात चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे, हे विसरू नका. यावेळी हा फक्त सरकारी आदेश नसून ‘श्रीं ची इच्छा समजा असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.
राज्य सरकारने धार्मिक स्थळं खुली करून देताना त्यासाठीच्या मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. यामध्ये मूर्ती, पुतळे, धर्मग्रंथांना हात न लावता दूरून दर्शन घेण्याच्या सूचना करण्यात आल्यात.
महत्वाच्या बातम्या-
बिहार काँग्रेसमध्ये मोठी फूट पडणार?; आमदार एनडीएत सामील होण्याची शक्यता
“किरीट सोमय्या यांच्या बोलण्याला त्यांचा पक्षही गांभीर्याने घेत नाही, त्यामुळे त्यांनी…”
नितीश कुमारांनी दिला राजीनामा, नेता निवडीसाठी एनडीएची उद्या बैठक
सुशांतला मी बिहारचा मानत नाही, तो मुंबईचाच- संजय राऊत
“कुंभकर्णी निद्रित असणारं अहंकारी महाराष्ट्र सरकार अखेर जागं झालं”