बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

”पंजाबच्या मुख्यमंत्रिपदी नवज्योतसिंग सिद्धूंची निवड होऊ नये म्हणून मी शेवटपर्यंत लढा देईन”

नवी दिल्ली | कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पंजाब काॅंग्रेसने चरणजीत सिंग चन्नी यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणुन निवड केली. अशातच काॅंग्रेस पक्षनेतृत्वावर नाराजी व्यक्त करताना अमरिंदर सिंग यांनी पंजाब काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर निशाणा साधला.

पंजाबमध्ये अमरिंदर सिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील राजकीय वाद सगळ्यांना माहिती आहे. पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सिद्धू यांच्याविरोधात ताकदवान उमेदवार उभा करणार आहे. पंजाबच्या मुख्यमंत्रिपदी नवज्योतसिंग सिद्धू यांची निवड होऊ नये, यासाठी मी लढा देईन. देशाला अशाप्रकारच्या धोकादायक माणसापासून वाचवण्यासाठी मी कोणताही त्याग करायला तयार आहे, असंही अमरिंदर सिंग म्हणाले. त्यामुळे पंजाबमध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलचं तापलेलं दिसुन येत आहे.

प्रियंका गांधी आणि राहुल गांधी हे माझ्या मुलांसारखे आहेत. हे असं सारं संपायला नको होतं. त्यामुळे मी फार दुखी झालो आहे. हे दोघेही फार अनुभवी आहेत. परंतु त्यांचे सल्लागार त्यांना चुकीचे मार्गदर्शन करत आहेत, अशीही टीका अमरिंदर सिंग यांनी केली.

दरम्यान, अमरिंदर सिंग यांनी आगामी निवडणुकीसाठी सर्व पर्याय खुले असल्याचं वक्तव्य केलं आहे. परंतु अद्यापही त्यांनी काॅंग्रेस पक्ष सोडण्याचा अथवा अन्य पक्षात जाण्याचा निर्णय घेतला नाही.

थोडक्यात बातम्या- 

‘तुम्ही माझ्या पाया नका पडू, मीच तुमच्या पडतो’; ‘या’ मराठमोळ्या कलाकारासमोर झुकले महानायक!

महिला सुरक्षेबाबत नाना पटोलेंचं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र; केली ‘ही’ मोठी मागणी

“प्रभू श्रीराम एक महापुरूष होते हे मी मानत नाही”; माजी मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य!

भारताच्या इशाऱ्यानंतर ब्रिटनचा यु-टर्न; भारतीय नागरिकांना मोठा दिलासा

”आपलं कातडीबचाऊ समर्थन शिवरायांच्या महाराष्ट्रास साजेसं नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More