बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अमरिंदर सिंग यांना ‘पाकिस्तानी मैत्री’ भोवणार?; पंजाब सरकारकडून चौकशीचे आदेश

चंदीगड | देशाच्या राजकारणात सध्या पंजाबमधील राजकीय परिस्थितीची जोरदार चर्चा होत आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आता काॅंग्रेस विरोधात मोर्चा उघडला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. अशातच आता पंजाब सरकारनं कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या जवळच्या सहकाऱ्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांची पाकिस्तानी पत्रकार अरूशा आलम यांच्यासोबत चांगली मैत्री आहे. आलम यांच्यावर आयएसआयसोबत काम करण्याचा आरोप लावण्यात आला आहे. परिणामी आलम यांची आपण चौकशी करणार का? असं पंजाबचे गृहमंत्री सुखजिंदर रंधावा यांना विचारलं असता, वरिष्ठ पोेलीस अधिकाऱ्यांना आलम यांच्या चौकशीचे आदेश दिल्याचं रंधावा म्हणाले आहेत.

आरूशा आलम या सुरक्षा पत्रकार आहेत. अमरिंदर सिंग आणि आलम यांची चांगली मैत्री आहे. आरूशा आणि कॅप्टन अमरिंदर यांची पहिल्यांदा भेट 2004 मध्ये झाली होती. अमरिंदर सिंग यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी पण आलम भारतात आल्या होत्या. अमरिंदर सिंग यांनी त्यांच्या पुस्तकात सुद्धा या मैत्रीचा उल्लेख केला आहे. अमरिंदर सिंग अनेकदा आलम यांच्या मैत्रीमुळं अडचणीत आले आहेत.

दरम्यान, अमरिंदर सिंग यांनीच पाकिस्तानकडून भारतात ड्रोनद्वारे लक्ष ठेवलं जात असल्याची तक्रार केली होती. आता त्यांची मैत्रीण आलम यांच्या चौकशीचे आदेश पंजाब सरकारनं दिल्यानं सर्वांचं लक्ष अमरिंदर सिंग यांच्या भूमिकेकडं लागलं आहे.

थोडक्यात बातम्या 

प्रवरा ग्रामीण महाविद्यालयाच्या नुतन इमारतीचे भूमिपूजन राज्यपाल कोश्यारींच्या हस्ते संपन्न होणार

“अंबानी आणि संघातील एका व्यक्तीने मला 300 कोटींची लाच देण्याचा प्रयत्न केला”

मोठी बातमी! भीमा कोरेगाव प्रकरणात परमबीर सिंग आणि रश्मी शुक्ला यांना समन्स

‘बॅंक साताऱ्याची मग निर्णय पुण्यात का?’, उदयनराजेंचा ‘या’ तीन नेत्यांना सवाल

जेवणानंतर खाल्लेले अन्न पचत नाही?; मग वाचा ‘हे’ घरगुती आयुर्वेदिक उपाय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More