प्रितम मुंडेंच्या विरोधात अमरसिंह पंडित निवडणूक लढणार??

बीड | खासदार प्रितम मुंडे यांच्या विरोधात बीड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अमरसिंह पंडित निवडणूक लढणार आहेत, अशी माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती मिळत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून बीडच्या जागेसाठी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित आणि जयदत्त क्षीरसागर यांची नावं चर्चेत होती, मात्र अमरसिंह पंडित यांनाच उमेदवारी देण्यात येणार अशी माहिती आहे.

बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून प्रितम मुंडे यांना उमेदवारी देणार असल्याचं रावसाहेब दानवे यांनी जाहीर केलं आहे.

दरम्यान, बीडच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अमरसिंह पंडित भाजपच्या प्रितम मुंडे यांना कसं आव्हान देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

युतीच्या चर्चेसाठी गडकरी, शहा ‘मातोश्री’चा उंबरा ओलांडणार?, हालचालींना वेग

नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत; मुलायम सिंग यादवांनी दिल्या शुभेच्छा

मला तुमची लाज वाटते, प्रकाश राज यांची अमित शहांवर सटकली

राष्ट्रवादी काँग्रेस विजयसिंह मोहिते पाटील यांना राज्यसभेवर पाठवणार?

मोदींनी ‘अशाप्रकारे’ केले जनतेला 15 लाख रुपये देण्याचे आश्वासन पूर्ण- व्ही. के. सिंह 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या