Top News मनोरंजन

सिनेमागृहं उघडण्यासाठीच ॲमेझाॅनचं एक पाऊल पुढे; ‘या’ नऊ सिनेमांची घोषणा

मुंबई | केंद्र सरकारने 15 ऑक्टोबरपासून चित्रपटगृह पुन्हा सुरु करण्यास परवानगी दिलीये. मात्र अजूनही नागरिकांच्या मनात चित्रपटगृहात जाऊन सिनेमा पहायाची भिती दिसून येतेय.

यासाठी अनेक निर्मात्यांनी डिजिटल प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, ‘अ‍ॅमेझॉन प्राईम’वर 9 नवीन चित्रपट येत्या तीन महिन्यांत प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

अ‍ॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणाऱ्या या 9 चित्रपटांची घोषणा करण्यात आलीये. यामध्ये हिंदीसह तमिळ, मल्याळम, कन्नड, तेलगू हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

प्रदर्शित होणारे सिनेमे-

  • हलाल लव्ह स्टोरी (मल्याळम) – 15 ऑक्टोबर
  • भीमासेना नला महाराजा (कन्नड) – 29 ऑक्टोबर
  • सूरारी पोट्टूरु (तमिळ) – 30 ऑक्टोबर
  • छलांग (हिंदी) – 13 नोव्हेंबर
  • माने नंबर 13 (कन्नड) – 19 नोव्हेंबर
  • मिडल क्लास मेलडीज् (तेलगू) – 20 नोव्हेंबर
  • दुर्गावती (हिंदी) – 11 डिसेंबर
  • मारा (तामिळ) – 17 डिसेंबर
  • कुली नंबर 1 (हिंदी) – 25 डिसेंबर

 

महत्त्वाच्या बातम्या

अश्विनीकुमार यांच्या मृत्यूचं रहस्य उलगडण्यात कोणाला रस नाही- शिवसेना

…म्हणून ‘अवॉर्ड शो’चा मला प्रचंड राग येतो- सैफ अली खान

प्रसारमाध्यमांची गळचेपी भारतीय जनता सहन करणार नाही- प्रकाश जावडेकर

लालू प्रसाद यादव यांना जामीन मंजूर पण…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या