बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

परळीनंतर आता ‘या’ देवस्थानालाही बॉम्बने उडविण्याची धमकी

बीड | दोन दिवसांपूर्वी परळी वैजनाथ येथील मंदिर ट्रस्टला 50 लाख रुपये द्या, अन्यथा मंदिर आरडीएक्सने उडवून दिलं जाईल, अशा धमकीचं पत्र प्राप्त झालं होतं. त्यानंतर बीड जिल्हा प्रशासन अलर्ट झालं होतं व परिसरात एकच खळबळ माजली होती. त्यातच आता बीड जिल्ह्यातीलच आणखी एका मंदिर देवस्थानला धमकी देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील जागृत योगेश्वरी देवस्थानला 50 लाख रुपये द्या, अन्यथा मंदिर उडवून देऊ, अशी धमकी मिळाली आहे. धमकीचे पत्र मंदिर देवस्थानला येत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे, तसेच पोलिस यंत्रणाही सतर्क झाली आहे.

दोन दिवसांपूर्वी परळी वैजनाथ मंदिर ट्रस्टला 50 लाख रुपये मागणी करणारे पत्र मिळाल्यानंतर आता आता बीड जिल्ह्यातीलच अंबाजोगाईच्या योगेश्वरी मंदिराला पैशाची मागणी करणारे पत्र आल्याने हे नेमकं का? आणि कोण करतंय?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, मंदिराला टार्गेट करण्यामागे बीड जिल्ह्यातील दोन्ही मंदिर असल्याने अनेक चर्चांना उधाण आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे दोन्ही मंदिराला लिहिलेल्या पत्रामध्ये नांदेडच्या एका व्यक्तीचा पत्ता लिहिण्यात आला आहे. त्यानुसार आता पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या

“उद्धव ठाकरे हे अपघाताने झालेले मुख्यमंत्री, केंद्राची कामंही त्यांनी आपल्या खात्यात मांडली”

संजय राऊत आणि सुप्रिया सुळेंचा भन्नाट डान्स व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

“पार्टी आणि पबमध्ये भाजप नेते नेमके कुठे असतात हे उद्यापासून काढायला लावू नका”

मी आताही सत्तेत नाही आणि भविष्यातही मला सत्ता नको- नरेंद्र मोदी

“हे महाविकास आघाडी नव्हे तर महाघोटाळा आघाडी सरकार आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More