Top News आरोग्य विदेश

सेक्स करताना संमतीशिवाय कंडोम काढणं आता बेकायदेशीर; होणार शिक्षा!

Photo Courtesy- Pixabay

वॉशिंग्टन | सेक्स करताना पार्टनरच्या संमतीशिवाय कंडोम काढणं आता बेकायदेशीर होणार आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यात आता यासंदर्भात कायदा होणार आहे. अशाप्रकारे कायदा करणारं हे अमेरिकेतीलच नव्हे तर जगातील पहिले राज्य ठरणार आहे. या कायद्याची आता जगभरात चर्चा सुरु झाली असून इतरही देशांमध्ये या कायद्याबाबत जागरुकता निर्माण होण्याची शक्यता आहे.

नेमका काय आहे हा कायदा?-

सेक्स हा एकमेकांच्या संमतीने जरी होत असला तरी पार्टनरच्या संमतीशिवाय काहीजण कंडोम काढून सेक्स करण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी पार्टनरला ईजा तसेच मानसिक त्रास होऊ शकतो. यासंदर्भात बऱ्याच चर्चा आणि वाद झाल्यानंतर या कायद्यासंदर्भात जनजागृती झाली आणि सेक्स करताना पार्टनरच्या संमतीशिवाय कंडोम काढणं बेकायदेशीर ठरवणारं विधेयक आता येऊ घातलं आहे.

कुणी आणि का या कायद्यासाठी प्रयत्न केले?

कॅलिफोर्नियातील असेम्बली सदस्य क्रिस्टिना गार्सिया यांनी हे विधेयक मांडलं आहे. हे विधेयक मांडण्यामागचे दोन उद्देश त्यांनी वॉशिग्टन पोस्टशी बोलताना सांगितले आहेत. “एक म्हणजे पीडित व्यक्तीला न्याय मिळावा आणि दुसरं म्हणजे आपण पुस्तकांमध्ये सेक्स लाईफसंबंधी ज्या चांगल्या गोष्टी वाचतो त्याबद्दल जाहीर चर्चा व्हावी, विशेष करून तरुणांनी यावर चर्चा करावी. वाईट गोष्टी टाळण्यासाठी याची मदत होईल”

गार्सिया यांनी यापूर्वी दोनवेळा स्टिलथिंग (Stealthing) म्हणजेच पुरुषाने “सेक्स करताना पार्टनरच्या परवानगीशिवाय कंडोम काढणे” हे विधेयक सादर केलं होतं. त्यांच्या प्रयत्नामुळे 2017 आणि 2018 मध्ये राज्य दंड संहितेत सुधारणा देखील करण्यात आली होती, मात्र त्यानंतर या विधेयकावर सुनावणी झाली नाही. आता मात्र हे विधेयक इतर राज्यांसाठी देखील दिशादर्शक ठरु शकणार आहे.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, अशा स्वरुपाचा कायदा झाला तर राज्यातील हा पहिला कायदा असेल, की जो असंवेदनशीलपणे कंडोम काढण्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधेल. या कायद्याच्या माध्यमातून असं करणाऱ्या पुरुषांवर कारवाई करण्याचा कायदेशीर अधिकार पीडित व्यक्तीला मिळणार आहे.

कंडोम काढण्याविरोधात कसा उठला पहिला आवाज?

सुमारे ४ वर्षांपासून या मुद्द्यावर आवाज उठवला जात आहे. पहिल्यांदा येल विद्यापीठात कायद्याचा अभ्यास करणाऱ्या अलेक्झांड्रा ब्रॉडस्की या विद्यार्थिनीने याबाबत ‘कोलंबिया जर्नल ऑफ जेंडर अँड लॉ’मध्ये एक लेख लिहिला होता. त्यानंतर या प्रकाराबाबत जागरुकता होण्यास सुरुवात झाली.

सेक्स करताना पार्टनरच्या परवानगीशिवाय कंडोम काढणं ही एक गंभीर बाब असून पीडित व्यक्तीचा सन्मान आणि तिच्या स्वायत्ततेचं उल्लंघन असल्याचं तीनं म्हटलं होतं. लैंगिक संबंधामुळे होणाऱ्या संसर्गाला आणि मनाविरुद्ध राहणाऱ्या गर्भधारणेला बळी पडलेल्या व्यक्तींच्या मानसिक धक्क्याविषयी तीनं त्यात लिखाण केलं होतं. त्यामुळे हा प्रश्न चांगलाच चर्चेत आला होता.

सध्या नागरी हक्क वकील म्हणून काम करत असलेल्या ब्रॉडस्कीने ‘द पोस्ट’ला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीतही तीने अनेक गंभीर मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. मुलाखतीत ती म्हणते, की “या विषयाबद्दल अजूनही गैरसमज आहेत, ही एक समस्या आहे हे मानायला लोक तयार नाहीत. असा प्रकार करणं घातक असल्याचं अनेकांच्या मनाला अजूनही पटत नाही.”

जे लोक लैंगिक संबंध ठेवतात त्यांच्याकडून अशा प्रकारचं उल्लंघन होतं. पीडीत व्यक्तीनं लैंगिक संबंधास मान्यता दिली याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही करु शकता. तरीसुद्धा अनेकजण या व्यक्तीच्या संमतीशिवाय लैंगिक संबंधांदरम्यान कंडोम काढतात आणि हे एक प्रकारचं उल्लंघनच आहे, असं त्या म्हणाल्या.

दरम्यान, कंडोम काढून टाकण्यासाठीची संमती, तसेच या प्रकारामुळे पीडित व्यक्तीवर होणारे आघात या साऱ्याचं चित्रण करणारा ‘मी तुम्हाला नष्ट करु शकतो` हा शो त्यांनी एचबीओवर (HBO) या वाहिनीवर सादर केला होता. त्यातून या विषयाबाबत विदारक चित्र सर्वांसमोर मांडले होते. या शोचा आधार गार्सिया यांनी हे विधेयक मांडण्यासाठी घेतला आहे.

थोडक्यात बातम्या-

तो आला, पत्नीला प्रियकरासह पाहिलं, अन् त्यानंतर रंगला खुनी खेळ!

राजकारणातील बादशहाला भेटायला बॉलिवूडचा शहेनशहा बारामतीत?

धक्कादायक अपघात, …अन् कार थेट विहिरीत कोसळली!

‘पोलिसांनी पूजा चव्हाणची ती गोष्ट तपासावी, बऱ्याच गोष्टी बाहेर येतील’; भाजपच्या नेत्याच्या गौप्यस्फोट

…ही बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसाठी लाजिरवाणी गोष्ट- चंद्रकांत पाटील

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या