Loading...

…तर थिएटरमध्येच खळखट्ट्याक करू, मनसेचा इशारा

मुंबई | मल्टिप्लेक्स थिएटरमधले पाचही स्क्रीन बळकवणाऱ्यांचा मुजोरपणा खपवून घेणार नाही. महाराष्ट्रात मराठी सिनेमांना स्क्रीन मिळणारच. देवा आणि गच्ची या मराठी सिनेमांना स्क्रीन न दिल्यास थिएटरमध्येच खळखट्ट्याक होईल, असा इशारा मनसेनं दिलाय.

महाराष्ट्रात मराठी सिनेमांला स्क्रीन मागावी लागते हे दुर्दैव आहे. मराठी सिनेमाला  स्क्रीन देण्याचा कायदाच आहे. त्यासाठी आम्ही भांडतोय. तो आमचा हक्क आहे, असं मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सांगितलं.

Loading...

अमेय खोपकर आणि अभिनेते अंकुश चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन इशारा दिलाय.

Loading...