देश

“ईशान्य भारतातील हिंसेला काँग्रेस जबाबदार”

नवी दिल्ली | दिल्लीत काँग्रेसने ‘देश बचाओ’ रॅलीद्वारे भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी झारखंड येथे प्रत्युत्तर दिलं आहे. ईशान्य भारतात अनेक ठिकाणी नागरिक दुरूस्ती कायद्यावरून हिंसक आंदोलने होते आहेत. या हिंसेला काँग्रेसच जबाबदार असल्याचा आरोप, भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे.

भाजपने नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणल्यानं काँग्रेसला पोटशूळ उठला आहे. काँग्रेस पक्ष हिंदू-मुस्लिम राजकारण, नक्षलवाद आणि दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचा गंभीर आरोप, अमित शहा यांनी केला आहे.

आम्ही तिहेरी तलाक कायदा आणला तर काँग्रेसनं त्याला मुस्लिमविरोधी म्हटलं आणि आता नागरिकत्व दुरुस्ती कायदाही काँग्रेसला मुस्लिमविरोधी वाटत आहे. त्यामुळं काँग्रेस ईशान्येत हिंसा भडकवत आहे, असं अमित शहा यांनी म्हटलं आहे.

बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात धार्मिक अवहेलना झेलणारे शरणार्थी अनेक वर्षे नरकातलं जीवन जगत आहेत, पण काँग्रेस याला मुस्लिमविरोधी म्हणत आहे. नागरिक दुरूस्ती कायदा हे विधेयक मुस्लिम विरोधी नाही. मात्र, काँग्रेसला सर्व काही मुस्लिमविरोधी आहे. असं बोलण्याची सवय लागली असल्याचं, अमित शहा यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या