Top News देश

राजकारणातील खरे चाणक्य तुम्ही की शरद पवार? अमित शहा म्हणाले…

Loading...

नवी दिल्ली | राजकारणातील खरे चाणक्य कोण तुम्ही की राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार असा थेट सवाल गृहमंत्री अमित शहा यांना विचारण्यात आला होता. यावर शहा यांनी दिलेलं उत्तर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

शरद पवारांबाबत बोलायचे झाल्यास ते दिग्गज राजकीय नेते आहेत. त्यांनी अनेक सरकारं पाडली आहेत. नवीन सरकारं स्थापनही केली आहेत, असं म्हणत अमित शहा यांनी मुलाखतकाराच्या प्रश्नाला थेट उत्तर देणं टाळलं आहे.

Loading...

मी चाणक्यनिती खूप वाचली आहे. ती समजून घेण्याचा प्रयत्नही केला आहे. चाणक्य यांच्याइतका मी महान नसून तसा विचारही करू शकत नाही. भगवान चाणक्य यांच्याशी होणाऱ्या तुलनेबाबत मी विचारही करू शकत नाही, असंही शहा म्हणाले.

दरम्यान, गेल्या दोन वर्षाच्या काळात भाजपच्या हातून सहा राज्य केली आहेत. त्यामुळे राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जाणारे अमित शहा यांची जादू फिकी पडल्याचं बोललं जात आहे.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

मुख्यमंत्र्यांचा मुलगा स्वखर्चाने उभारणार शिवाजी महाराजांचा पुतळा

क्रिकेट हा खेळ ‘जेंटलमेन्स गेम’ राहीला नाही- कपील देव

महत्वाच्या बातम्या-

Loading...

औरंगाबादचं नाव ‘संभाजीनगर’करून मुख्यमंत्री सरप्राईज देणार- चंद्रकांत खैरे

इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा; अंद्धश्रद्धा निर्मुलन समितीची मागणी

राजमुद्रेवरुन सुरु झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य

 

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या