Loading...

काँग्रेसला 70 वर्षांत जमलं नाही; ते आम्ही 75 दिवसांत करून दाखवलं!

जींद | काँग्रेसला जे 70 वर्षात जमलं नाही ते आम्ही 75 दिवसांत करून दाखवलं, असं म्हणत केंद्रिय गृहमंत्री आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या देदिप्यमान यशानंतर भाजप आता विधानसभेच्या तयारीला लागलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर अमित शहा एका सभेत बोलत होते.

मी 5 वर्षांपूर्वी चौधरी बीरेंद्र सिंह यांना भाजप सदस्य बनवण्यासाठी आलो होतो. त्यानंतर आता चौथ्या वेळेस येत आहे. हरियाणात येणारी विधानसभा निवडणूक भाजप नक्की जिंकेल, असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला.

Loading...

भाजपने अनेक देशहिताचे निर्णय घेतले. तिहेरी तलाक, कलम 370 विधेयकाचा यावेळी अमित शहांनी पुनरूच्चार केला.

दरम्यान, शेतकरी आणि व्यापाऱ्यांना पेन्शन देण्याची ऐतिहासिक योजना मोदी सरकारने लागू केली. यामुळे तळागाळातील माणूस भाजपसोबत आहे, असं शहा म्हणाले.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-“संपूर्ण देश स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना आम्हाला प्राण्यांसारखं पिंजऱ्यात ठेवलंय”

-“महाराष्ट्रातूनच मराठी चित्रपटसृष्टीचं स्वातंत्र्य हिरावून घेतल्यासारखं वाटतंय”

-संकट खूप मोठं आहे… शर्मिला ठाकरे यांच्या प्रशासनाला सूचना

Loading...

काश्मिर भारताचा अविभाज्य भाग… उगीचच नाक खूपसू नका; अदनान सामीने टीकाकारांना सुनावले

-सांगली-कोल्हापूरमध्ये 50 घरं बांधून देणार; मिका सिंगचं पूरग्रस्तांना आश्वासन

Loading...