बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

माझी प्रकृती ठणठणीत आहे, मला कोणताही आजार नाही- अमित शहा

मुंबई |  गृहमंत्री अमित शहा यांची तब्येत बरी नसल्याच्या अफवा गेल्या आठवड्याभरपासून पसरत होत्या. सोशल मीडियावर अमित शहा यांच्या प्रकृतीविषयी चर्चा झडत होत्या. खुद्द अमित शहांनीच त्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

माझी प्रकृती अतिशय ठणठणीत असल्याचं त्यांनी ट्विटरवरून सांगितलं आहे. तसंच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असं सांगताना अफवा पसरवणाऱ्यांना त्यांना खडे बोल सुनावले आहेत.

मागील काही आठवड्यांपासून माझ्या तब्येतीसंदर्भात सोशल मिडियावर अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. मी कामात व्यस्त असल्याने या अफवांकडे दुर्लक्ष केलं. मात्र पक्ष कार्यकर्ते आणि शुभचिंतकांच्या काळजीपोटी आपण ठणठणीत असल्याचं मला सांगावं लागतंय, असं ते म्हणाले.

दरम्यान, अमित शाह यांच्या तब्येतीविषयी सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्या चौघांना गुजरातमध्ये अटक करण्यात आली आहे. दोन व्यक्तींना भावनगर तर दोन व्यक्तींना अहमदाबादमधून अटक करण्यात आली आहे.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

दुकानं तसंच बांधकाम व्यवसाय सुरू करा; तज्ज्ञांच्या समितीचा अजित पवारांकडे अहवाल सुपूर्द

…पण अर्थव्यवस्था देखील पहावी लागेल, लॉकडाऊनवर गडकरींचं रोखठोक मत

महत्वाच्या बातम्या-

“राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतीये, अन् 3 पक्षांचं सरकार कुरघोडीच्या राजकारणात व्यस्त”

राज्यातला कोरोनाबाधितांचा आकडा 20 हजार पार… मात्र दिलासादायक बाब म्हणजे 3800 बरे होऊन घरी!

मुंबईत कोरोनाचा कहर सुरूच; गेल्या चोवीस तासांत मिळाले तब्बल एवढे रूग्ण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More