बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘दिरंगाईचा खेळ कायमचा थांबवा’; अमित ठाकरे संतापले

मुंबई | MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं पुण्यात एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. स्वप्नील लोणकर असं या तरुणाचं नाव आहे. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पूत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.

अमित ठाकरे यांनी फेसबुकवर एक पोस्ट करत लोकसेवा आयोगाला सुनावलं आहे. एमपीएससीची परीक्षा प्रक्रिया रखडल्यामुळे स्वप्नील लोणकर या हुशार तरुणाने आत्महत्या केल्यामुळे अवघा महाराष्ट्र हळहळत आहे. भरपूर अभ्यास करून प्रशासकीय अधिकारी बनून महाराष्ट्राची सेवा करू इच्छिणारा स्वप्नीलसारखा एक संवेदनशील तरुण जर ‘एमपीएससी हे मायाजाल आहे’ असं म्हणत आत्महत्या करत असेल, तर त्याच्या या म्हणण्याला सर्वांनीच अत्यंत गांभीर्याने घेण्याची गरज आहे, असं अमित ठाकरे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

परीक्षा दिरंगाई, निकाल दिरंगाई आणि नियुक्ती दिरंगाई हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे तीन आवडते उद्योग आहेत आणि त्यामुळे गेली अनेक वर्षं लाखो तरुण-तरुणींच्या आयुष्याचे कधीही भरुन न येणारे नुकसान होत आहे. साहजिकच एमपीएससी परीक्षार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये संताप खदखदत आहे, असं अमित ठाकरे म्हणाले.

स्वप्निल लोणकर याच्या आत्महत्येनंतर विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. ही आत्महत्या नव्हे तर हा व्यवस्थेने केलेला खून आहे, अशी तीव्र भावना विद्यार्थी व्यक्त करतायेत. स्वप्निलने तर जीव दिला, आणखी किती जणांनी जीव द्यावा म्हणजे सरकारला जाग येईल, असा सवाल विद्यार्थ्यांनी केलाय.

थोडक्यात बातम्या- 

चिंता वाढली! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ

आता पुण्यातील ‘या’ नव्या रेल्वे स्थानकावरून सुटणार स्वतंत्र रेल्वेगाड्या; 9 जुलैला सुटणार पहिली रेल्वे

मुंबईतील कोरोना आटोक्यात; नव्या बाधितांसह सक्रिय रूग्णसंख्येत घट!

पुणे कोरोना अपडेट! जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा राज्य सरकारवर घणाघात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More