बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मराठी भाषादिनी राज ठाकरेंची मोठी घोषणा, आता अमित ठाकरे…

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषादिनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. राज ठाकरे यांंनी त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या खांद्यावर एक नवी जबाबदारी सोपवली आहे.

गेल्या काही काळापासून अमित ठाकरे राजकारणात चांगलेच सक्रिय दिसत आहेत. अमित ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मनसेने रविवारी परिपत्रक जारी करत याबद्दलची माहिती दिली आहे.

अमित ठाकरे मुंबईतील मनसे कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत. त्यात काही दिवसांपूर्वी अमित ठाकरेंनी नाशिक दौरा देखील केला होता. त्यामुळे नाशिक महपालिका निवडणुकीची धुराही अमित ठाकरेंकडे सोपवली जाणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनीदेखील शिवसेनेच्या अखिल भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून त्यांच्या कारकिर्दीची सुरूवात केली होती. आता स्वत:ला सिद्ध करण्यासाठी अमित ठाकरेंनाही एक व्यसपीठ मिळालं आहे. त्यामुळे अमित ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची धुरा कशी सांभाळतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

डोळ्यांचा पांढरा भाग लाल होत असेल तर दुर्लक्ष करू नका, होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार

मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी राणे पिता पुत्रांना मोठा झटका

सुरू करा हा व्यवसाय अन् महिन्याला कमवा 3 लाख रूपये

येत्या काही तासात ‘या’ भागात पाऊस कोसळणार; हवामान खात्याचा इशारा

“शरद पवारांना 2024ला सर्वात मोठी भेट द्यायचीये, कामाला लागा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More