बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज ठाकरेंच्या नातवाची पहिली झलक आली समोर, पाहा फोटो

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर आजोबा अशी नवी जबाबदारी पडली आले. अमित ठाकरे (Amit Thackeray) व मिताली ठाकरे (Mitali Thackeray) यांना काही दिवसांपूर्वी पूत्ररत्न प्राप्त झाला. राज ठाकरे आजोबा झाल्यानंतर त्यांच्या नातवाची पहिली झलक समोर आली आहे.

अमित ठाकरे यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून त्यांच्या बाळाचा पहिला फोटो शेअर केला आहे. मिताली ठाकरेंचे सासर आणि माहेर दोन्ही मुंबईत असल्याने बाळाचा जन्मही मुंबईत झाला.

शिवतीर्थावर नव्या पाहुण्याचे आगमन झाल्यानंतर अमित ठाकरेंनी पहिल्यांदाच बाळाचा फोटो शेअर केला आहे. अमित ठाकरेंनी फोटो शेअर करताच त्यावर लाईक, कमेंट्स आणि शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे.

दरम्यान, अमित ठाकरे आणि मिताली बोरूडे 2019 साली विवाहबंधनात अडकले होते. या शाही लग्नसोहळ्याला राजकीय नेते मंडळींसह सिनेविश्वातील अनेक दिग्गजांनी देखील हजेरी लावली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी अमित व मिताली यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे.

पाहा फोटो-

थोडक्यात बातम्या-

“भाजपचे काही नेते पिसाळलेला कुत्रा चावल्यागत वागत आहेत”

औरंगाबाद सेक्स व्हिडीओ प्रकरण, तृप्ती देसाईंनी थेट गृहमंत्र्यांना पाठवले व्हिडीओ

Russia-Ukraine War | ब्रिटनचे पंतप्रधान थेट युक्रेनमध्ये पोहोचले, पाहा व्हिडीओ

विद्यार्थ्यांनो लागा तयारीला; SBI मध्ये पदभरतीची घोषणा

‘अनिल देशमुखांची संपत्ती परत करा’; सर्वोच्च न्यायालयाने ईडीला फटाकारलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More