देश

अमिताभ बच्चन यांचं ट्वीटर अकाउंट हॅक; प्रोफाईल फोटो पाहून त्यांनाही धक्का बसला

मुंबई | बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचं ट्वीटर अकाउंट सोमवारी हॅक करुन हॅकर्सनी त्यांच्या ट्वीटर हॅण्डलचा प्रोफाईल बदलून त्याजागी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो लावला होता.

बीग बी यांचं ट्वीटर हॅण्डल तुर्कीच्या ‘टर्किश साइबर आर्मी’ अयिल्दिज टीमने हॅक केलं होेतं. बीग बी यांच्या ट्वीटरवरुन तुर्की आणि पाकिस्तानशी संबंधित पोस्ट शेअर करण्यात आल्या होत्या.

ट्वीटर अकाउंट हॅक झाल्याची गोष्ट अमिताभ यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांचं ट्वीटर अकाउंट रिकव्हरी करण्यात आलं. हॅकर्सनी शेअर केलेले सर्व ट्वीट डिलीट केले आहेत.

दरम्यान, आईसलॅण्ड रिपब्लिकने तुर्कीच्या फुटबॉल खेळाडूंना दिलेल्या वागणुकीचा निषेध हॅकर्सनी बीग बी यांच्या ट्वीटर हॅण्डलवरुन केला आहे.

महत्वाच्या बातम्या

-मी निवडणूक लढवायची की नाही याचा निर्णय बाबा घेतील- आदित्य ठाकरे

-अकबरूद्दीन ओवैसी यांची प्रकृती चिंताजनक; असदुद्दीन यांचं प्रार्थना करण्याचं आवाहन

-मराठवाड्याचा दुष्काळ दूर करण्यासाठी राज्य सरकारच्या डोक्यात ‘हा’ प्लॅन

-“पवार घराण्याला घरी बसवण्याचा इतिहास पिंपरी चिंचवडकरांनी केलाय”

-खैरेंना धूळ चारलेल्या जलीलांनी उद्धव ठाकरेंना दिलं आव्हान

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या