बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हेंचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल

ठाणे |  महाराष्ट्रात सध्या भीषण दुष्काळ आहे. शेतकरी मेटकुटीला आला आहे. पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. याच मुद्द्यावरून शिरूरचे राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

दुष्काळाबाबत राज्य सरकारला अजिबात गांभीर्य नाहीये. दुष्काळात सरकारनं जी पावलं उचलणं गरजेचं होतं ती कुठलीही पावलं राज्य सरकारने उचलली नाहीयेत, अशी टीका त्यांनी फडणवीस सरकारवर केली.

दुष्काळासाठी राजकारण आणि पक्षाच्या पलिकडे जाऊन दुष्काळाच्या प्रश्नावर गांभीर्यानं लक्ष देणं आवश्यक आहे, असं ते म्हणाले.

राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या भावना आणि त्यांची परिस्थिती समजावून घेऊन त्यांना योग्य ती मदत केली पाहिजे, असं कोल्हे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

-रोहित शर्माने तोडला सचिन तेंडुलकर आणि रिचर्डचा ‘हा’ रेकॉर्ड

-आदित्य ठाकरे निवडणूक लढणार का??? त्यावर स्वत: आदित्य म्हणाले…

-नितीश कुमारांनी दिला भाजपला धक्का; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

-सत्तेत आहेत त्यांना सोडलंय… आणि आमच्यावर काय टीका करता??; पवारांचा आंबेडकरांना टोला

-“चंद्रकांत खैरेंचं मानसिक संतुलन बिघडलं आहे, त्यांनी तपासणी करून घ्यावी”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More