अमोल कोल्हे कृष्णकुंजवर राज ठाकरेंना भेटणार???

मुंबई | राष्ट्रवादीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे ‘कृष्णकुंज’वर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेणार असल्याचं कळतंय.

राज ठाकरे आणि अमोल कोल्हेंच्या भेटीकडे राज्याच्या राजकिय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. राज ठाकरे आणि अमोल काल्हे यांच्या भेटीमागचं कारण अद्याप कळू शकलं नाही.

आगामी विधानसभा निवडणुकीत मनसेला आघाडीसोबत घेण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर अमोल कोल्हे आणि राज ठाकरे यांच्या भेटीत आगामी विधानसभा निवडणुकीवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, ‘ही फक्त सदिच्छा भेट होती’ या नेहमीच्या राजकिय प्रतिक्रियेपलिकडे अमोल कोल्हे राज ठाकरेंच्या भेटीवर काय म्हणतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या

-धरणाचे पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

-धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल करा; औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

-योगी सरकारला सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं; पत्रकार प्रशांत कनोजिया यांची सुटका करण्याचे आदेश

विधानसभेला राज्यात महायुतीच्या ‘इतक्या’ जागा निवडून आणण्याचा सुधीर मुनगंटीवारांचा निर्धार

-दहावीच्या परिक्षेत साताऱ्याच्या जुळ्या भावांना जुळीच टक्केवारी