Top News

रोमॅंटिक गाण्याप्रकरणी माफी मागा; शिवसेनेची अमोल कोल्हेंकडे मागणी

पुणे |  राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांचं रोमॅंटिक गाणं पन्हाळा गडावर चित्रीत झालं होतं. या गाण्यामुळे पन्हाळा गडाचं पावित्र्य राखलं गेलं नाही, असा आरोप करत अमोल कोल्हेंनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी शिवसेनेच्या जिल्हा संघटक सुलभा उबाळेंनी केली आहे.

ते प्रत्येक वेळी आपल्या भाषणातून संभाजी यांचा भक्त असल्याचं भासवून नागरिकांची दिशाभूल करतात, असं म्हणत उबाळेंनी अमोल कोल्हेंवर निशाणा साधला.

तुम्ही शंभू आहात की कलाकार हे स्पष्ट करावं, असा घणाघात सुलभा उबाळेंनी अमोल कोल्हेंवर केला आहे.

दरम्यान, जो व्यक्ती छत्रपतींच्या नावाने मोठा झाला त्यांनी अशाप्रकारे किल्ल्याचा वापर करावा ही सर्वांसाठी चिड येणारी गोष्ट आहे, असं सुलभा उबाळेंनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

-मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खाण्यात मोदी ‘एक्सपर्ट’- प्रकाश आंबेडकर

-मी लहानपणी कोंबड्यांची अंडी विकायचो, हे दरवेळेस सांगत फिरु का?- अजित पवार

-मोठ्या संख्येने उपस्थित राहून राहुरीकरांनी माझ्यावरील प्रेम सिद्ध केलं- सुजय विखे

-“शेतकऱ्यांचे पैसे थकवणारे मोहिते पाटील मोदींच्या मांडीला मांडी लावून बसले होते”

-“दत्तक गावाचा विकास करता आला नाही, तुम्ही देशाचा विकास काय करणार?”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या