बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आपण भाजपमध्ये गेला नसता तर…;’अमोल मिटकरींचा चित्रा वाघ यांना टोला

मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजप नेत्या चित्रा वाघ आक्रमक झाल्या असतानाचं त्यांचे पती किशोर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. याप्रकरणात माझा आवाज दाबण्यासाठी सुड बुद्धीने गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी ट्विट करत चित्रा वाघ यांना उत्तर दिलं आहे.

किशोर वाघ सरांवर 12 फेब्रुवारी 2016 ला गुन्हा दाखल झाला आहे. भाजपने 2016 ला याबाबत खुली चौकशी सुरू केली होती. आपण भाजपमध्ये गेला नसता तर देवेंद्र फडणवीसांनी तेव्हाच गुन्हा दाखल केला असता, असं म्हणत अमोल मिटकरींनी  चित्रा वाघ यांना टोला लगावला आहे.

मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या तालमीत तयार झाले आहे, असं वक्तव्य चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलं होतं.  यावर आपण साहेबांच्या तालमीत तयार झाल्या आहात, त्यामुळे जनतेची दिशाभूल करू नये, असं म्हणत मिटकरींनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली आहे.

दरम्यान, लाच घेतल्याचं प्रकरण घडलं तेव्हा माझे पती घटनास्थळी उपस्थित नव्हते. याप्रकरणात मुख्य आरोपी असणारे गांधी रुग्णालयाचे तत्कालीन महानिरीक्षक गजानन भगत यांची चौकशी अजुन पुर्ण झाली नाही, त्या आधी माझ्या पतींवर गुन्हा कसा दाखल होऊ शकतो?, असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारला आहे.

 

थोडक्यात बातम्या-

“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री न्यायप्रिय, मिस्टर सत्यवादी, ते न्याय करणारच”

अरुण राठोडने कबुली जबाब दिलेला ‘तो’ नंबर कुणाचा?- चित्रा वाघ

‘चित्रा वाघ एवढा आकांड तांडव का करतीये?’; माजी IPS अधिकाऱ्याची पोस्ट व्हायरल

चित्रा वाघ यांच्या पत्रकार परिषदेतील सर्व मुद्दे वाचा एकाच ठिकाणी!

“मुंबई महापालिका म्हणजे यशवंत जाधव प्रा. ली. कंपनी आहे काय?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More