बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…हा हट्ट सोडा; राष्ट्रवादीचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आवाहन

मुंबई | अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीची तारीख 19 फेब्रुवारी ही जाहीर करावी आणि तिथीचा हट्ट मुख्यमंत्र्यांनी सोडावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली आहे.

मला पटतय, आपल्याला पटतय ना..?, असं अशा आशयाचं ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं आहे. ट्विटसोबत त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. त्यावर तिथीचा हट्ट सोडा आणि 19 फेब्रुवारीलाच शिवजंयतीची तारीख जाहीर करा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांना केलं आहे.

शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यावेळी इंग्रज भारतात नव्हते. त्यामुळे इंग्रजी पद्धतीने कालगणनाही केली जात नव्हती. तेव्हा महाराजांची जयंती ही मराठी तिथीप्रमाणेच साजरी व्हायला हवी, अशी भूमिका शिवसेनेची आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या आव्हानामुळे पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. आता मुख्यमंत्री यावर काय निर्णय घेतात. हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

‘नाईट लाईफ’ म्हणजे फक्त मौजमजा नाही- उद्धव ठाकरे

हिंदू स्त्रियांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पायांचं पूजन केलं पाहिजे- विक्रम गोखले

महत्वाच्या बातम्या-

संजय बरा बोलतो, येतो का पक्षात; स्टेजवरच राज ठाकरेंची मित्राला खुली ऑफर!

महात्मा गांधींविरोधात मी एकही शब्द बोललो नाही; अनंतकुमार हेगडेंचा घुमजाव

महात्मा गांधींना शिव्या देणारे रावणाची औलाद- अधीर रंजन चौधरी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More