मुंबई | कोरोना विषाणूविरोधातला लढा हा अधिकच तीव्र झाला आहे. महाराष्ट्र सरकारने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संचारबंदी लागू केली आहे. मात्र अशाही परिस्थितीत गांभीर्य नसलेली लोकं बिना कामाची घराबाहेर पडत आहे. अशा कायदा मोडणाऱ्यांना चांगलं चोपलं पाहिजे, असं मत राष्ट्रवादीचे युवक सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी मांडलं आहे.
महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकार जनतेची काळजी घेत आहे मात्र अशा अडचणीच्या परिस्थितीत नागरिक निष्काळजीपणाने वागत आहे. जर नागरिक ऐकत नसतील तर त्यांना चांगलं चोपून काढा, असं आवाहन त्यांनी पोलिसांना केलं आहे.
नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नसतं असं म्हणत त्यांनी घराबाहेर फिरणाऱ्यांबद्दलचा आपला संताप व्यक्त केला आहे. तसंच कोरोनाचं संकट फार मोठं आहे. त्याची भीषणता फार गंभीर आहे. त्यामुळे नागरिकांनी हा धोका ओळखून घरात बसावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या लोकांना पोलिसांनी अनेक ठिकाणी काठ्यांचा प्रसाद दिला होता. पुणे, औरंगाबाद तसंच जालना या ठिकाणचे व्हीडिओही सोशल मीडियात जोरदार व्हायरल झाले आहेत. लोकांनी देखील पोलिसांच्या या कृत्यांचं समर्थन केलं आहे. ज्यांना समजूतदारपणाची भाषा समजत नाही त्यांना अशीच शिक्षा देणं गरजेचं असल्याचं मत लोक सोशल मीडियावर व्यक्त करत आहेत.
ट्रेंडिंग बातम्या-
महाराष्ट्राला दुसरं मोठं यश; मुंबईतील 12 रुग्ण कोरोनामुक्त
“…तर देशातील कोरोनाग्रस्तांचा अपेक्षित आकडा 62 टक्क्यांनी कमी होईल”
महत्वाच्या बातम्या-
‘मी समाजाचा शत्रू आहे’, बाहेर फिरणारांच्या हातात पोलिसांनी दिले बोर्ड!
मास्क आणि सॅनिटायझरचा काळाबाजार कराल तर जेलमध्ये टाकेन; अजित पवारांची धमकी
संकट दाराशी उभं असताना गुढीपाडव्याची खरेदी करायला बाहेर पडू नका- शरद पोंक्षे
Comments are closed.