महाराष्ट्र मुंबई

“भाजपची ईडी आता सनम बेवफा झाली आहे; तिकडे फिरकलीच नाही”

मुंबई | खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी ईडी आणि भाजपवर हल्लाबोल केलाय.

भाजपची ईडी आता सनम बेवफा झालीय. 2014 नंतर भाजपच्या घोटाळे बहाद्दरांनी अनेक घोटाळे केले, पण भाजपची ईडी तिकडे फिरकलीच नाही, असा आरोप अमोल मिटकरी यांनी केलाय.

भाजपच्या घोटाळे बहाद्दरांनी अनेक घोटाळे केले. मग तो तुर डाळीचा घोटाळा असेल, बँकेचा घोटाळा, चिक्कीचा घोटाळा अशा ठिकाणी भाजपची ईडी कशी फिरकली नाही. गेल्या 2-4 दिवसांपासून एकाच बाजूने जातेय, असं मिटकरी म्हणालेत.

जय शाहाची 900 कोटी रुपयांची संपत्ती झाली. तिकडे तु गेली नाहीस. 2014 नंतर भाजपच्या घोटाळे बहाद्दरांकडे तुला जावं वाटलं नाही. एखादा कप चहा प्यायला तिकडे पण जा, असंही अमोल मिटकरी म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

मी त्यांना सांगितलं होतं, मात्र माझं कोणी ऐकलंच नाही- रोहित पवार

“तुम्ही चार द्या, पण दोन घ्यायची तयारी ठेवायलाच हवी”

…चांगलं काम केलं तर नोटीस मिळत नाही- देवेंद्र फडणवीस

“ईडीला आता कुणी घाबरत नाही, शरद पवार आणि ठाकरेंना नोटीस आली पुढे काय झालं?”

‘इंग्रजी विक म्हणजे….’; मराठी मुलांना अभिनेता स्वप्नील जोशीने दिला हा मोलाचा सल्ला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या