पुणे महाराष्ट्र

अक्षय बोऱ्हाडे-शेरकर वादाच्या कलाटणीनंतर मिटकरींची गरमागरम फेसबुक पोस्ट!

पुणे | उभ्या महाराष्ट्रात चर्चिला गेलेला सत्यशील शेरकर विरुद्ध अक्षय बोऱ्हाडे हा वाद अखेर मिटला आहे. दोन्ही बाजूंनी सामोपचारानं माघार घेत परस्पर सहमतीनं या वादावर पडदा टाकला.

शिवजन्मभूमीची बदनामी नको, या एकाच कारणामुळे हा वाद मिटल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये शिरोली बुद्रुक गावातील ग्रामस्थ, सरपंच, पोलीस पाटील यांनी प्रामुख्याने पुढाकार घेतला आणि बैठक घेऊन हा वाद गावातल्या गावात निकाली काढला. अक्षय बोऱ्हाडे-शेरकर वादाच्या कलाटणीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरींनी एक फेसबुक पोस्ट केली आहे.

अखेर टोळधाड उघडी पडली. राष्ट्रवादीचे जुन्नर चे आमदार, आमचे बंधू अतुलशेठ बेनके यांनी भक्तांची धारण चांगलीच पाचावर बसवली. विरोधकांनी एक कायम लक्षात ठेवावं इथे नमो भक्त नाहीत इथे राष्ट्रवादी आहे, असं म्हणत अमोल मिटकरी यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलंय.

तुम्ही कशीही चाल खेळलात तरी डाव जिंकणारे योद्धे इकडेच आहेत. शेवटी अख्या टोळधाडी वर अतुलशेठ यांनी फवारणी करून ट्रोल करणारे उघडे नागडे केलेत एक खंत कायम मनात राहील ती म्हणजे या सर्व प्रकारात खासदार डॉ. अमोल कोल्हे सारख्या प्रामाणिक व्यक्तीला जो मनस्ताप दिला तो कधीही भरून निघणार नाही, असं अमोल मिटकरींनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

मला सरकारची चिंता नाही… सरकार कुणी पाडू शकत नाही- उद्धव ठाकरे

“जवळपास 28 हजार रुग्ण बरे झालेत, महाराष्ट्राला बदनाम करण्याचं कारस्थान पाहून दु:ख होतं”

महत्वाच्या बातम्या-

बॉलीवूडचा दिग्गज गायक कोरोनाने हिरावला, संपूर्ण बॉलीवूड शोकसागरात

परप्रांतीय कामगारांना परत आणण्याची जबाबदारी उद्योजकांनी घ्यावी- नितीन गडकरी

हम होंगे कामयाब, राज्याचा डबलिंग रेट ११.७ वरून १७.५… पाहा किती रूग्ण वाढले, किती रूग्णांना डिस्चार्ज

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या