बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भाजपला आता आणखी एक मनोरंजन करणारा मित्रपक्ष मिळाला”

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसेच्या (MNS) गुडीपाडवा मेळाव्यात तुफान फटकेबाजी केली. राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) टीकेची झोड उठवली.

राज ठाकरे यांच्या गुडीपाडवा मेळाव्यातील भाषणानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटायला सुरूवात झाली आहे. राज ठाकरेंनी केलेल्या भाषणानंतर राष्ट्रवादीचे आक्रमक नेते व आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी राज ठाकरेंसह भाजपला देखील टोला लगावला आहे.

आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवुन गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात धर्मांध राजकारण करू पाहणाऱ्या भारतीय जनता पार्टीला आज आणखी एक मनोरंजन करणारा मित्रपक्ष मिळाला, अशी खोचक टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे.

दरम्यान, राज ठाकरेंच्या भाषणानंतर महाविकास आघाडीतून सडकून टीका केली जात आहे. राष्ट्रवादीचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील राज ठाकरेंचा खरपूस समाचार घेतला. त्यानंतर आता अमोल मिटकरींनीही ट्विट करत टोलेबाजी केली आहे.

 

थोडक्यात बातम्या-

“राज ठाकरे यांच्या इतका सरडा पण रंग बदलत नाही”

“पवार साहेब, उतार वयात विस्मरणाचा रोग जडला की कोलांट्या मारण्याची सवय?”

Raj Thackeray: “जो माणूस इतिहास विसरला, त्याच्या पायाखालचा भूगोल सटकला”

“हिंदू म्हणून आपण एक कधी होणार?”, राज ठाकरेंचा सवाल

जातीपातीच्या राजकारणाला शरद पवार जबाबदार – राज ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More