बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ए भाई , तू जो कोण असशील…”; भाई जगताप यांच्यावर अमृता फडणवीस भडकल्या

मुंबई | परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपामुळे राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. भाजपने अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावरून मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. राज्यातील पोलीसांची खाती ही स्वतःच्या बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली?, असा प्रश्न भाई जगताप यांनी उपस्थित केला होता. त्यामुळे हा विषय फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या जिव्हारी लागल्याचं दिसत आहे. अमृता फडणवीस ट्विट करत भाई जगताप यांना चांगलंच फटकारलं आहे.

‘ए भाई , तू जो कोण असशील माझ्या वर बोट उचलायचं न्हाय !’ पोलिसांची खाती तुमच्याच राज्यात तुम्ही ‘युटीआय बँक / अॅक्सिस बँक’ला योग्यता पाहून दिली होती!, अशा शब्दात त्यांनी भाई जगताप यांना उत्तर दिलं आहे. ‘लक्षात ठेव, सरळ रस्त्याने चालणाऱ्या माणसांना डिवसायचे न्हाय!’, अशा एकेरी भाषेत बोलत अमृता फडणवीस यांनी भाई जगताप यांना सुनावलं आहे.

भाजप सत्तेत असताना 21 जणांना फडणवीसांनी भ्रष्टाचाराच्या आरोपातून क्लिनचीट दिली होती. राज्यातील पोलीसांची खाती ही स्वतःच्या बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली? असा कडवा प्रश्न भाई जगताप यांनी फडणवीसांना विचारला होता. फडणवीस सरकराच्या काळात अनेक प्रकरणे अशी आहेत जी फडणवीस सरकारने दाबून टाकली होती, अशी टीका देखील भाई जगताप यांनी केली होती.

दरम्यान, विरोधीपक्ष गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. त्यावर सत्ताधारी विरोधकांना त्यांच्या सरकारच्या काळात केलेल्या कारनाम्याचा आरसा दाखवत आहे.

पाहा ट्विट –

 

थोडक्यात बातम्या-

“पोलीसांची खाती स्वत:च्या बायकोच्या बँकेत वर्ग केली तेव्हा फडणवीसांनी राजीनामा दिला होता का?”

गृहमंत्री अनिल देशमुखांवर झालेल्या आरोपांवर डॅशिंग IPS कृष्ण प्रकाश म्हणाले…

ही कोणती ‘शर्यत’? सांगलीत बैलगाडा शर्यतीत बैलांना बॅटरीने शाॅक देत मोठ्या काठीने जबर मारहाण

…तर आधी स्वत: खासदारकीचा राजीनामा द्या आणि मग राष्ट्रपती राजवटीच्या गप्पा करा- रुपाली चाकणकर

‘मी पुन्हा येईनचं स्वप्न अजूनही जिवंत आहे’; रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More