Loading...

देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयांचा अभिमान वाटतो- अमृता फडणवीस

मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयांचा आणि त्यांनी घेतलेल्या भूमिकांचा अभिमान वाटतो, असं काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्याबाबतचं ट्वीट अमृता यांनी केलं आहे.

काल फडणवीसांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पत्रकार परिषद घेत माध्यमांसमोर आपलं मत मांडलं. तो व्हीडिओ ट्वीट करत अमृता यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Loading...

काल 13 व्या विधानसभेचा कार्यकाल संपला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यावरच अमृता यांनी देवेंद्रजी, तुमचा अभिमान वाटतो, असं ट्वीट केलं आहे.

याआधीही देवेंद्र फडणवीस यांनी 100 नाही तर  200 टक्के काम केलंय. देवेंद्रजींसारखं काम आजपर्यंतही कुणी केलेलं नाही, आणि इथून पुढेही कुणी करू शकणार नाही, असं मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केलं होतं.

Loading...

अमृता फडणवीस यांचं ट्वीट-

 

महत्वाच्या बातम्या-

 

Loading...

 

 

 

Loading...