बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“लॉकडाऊनचा निर्णय मान्य, पण…”; अमृता फडणवीसांचा राज्य सरकारला सल्ला

मुंबई | कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महाराष्ट्रात ब्रेक द चेनच्या माध्यमातून निर्बंध आणखी कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. नवे निर्बंध 22एप्रिलपासून रात्री आठ वाजल्यापासून ते 1 मेपर्यंत सकाळी 7 वाजेपर्यंत असणार आहेत. सरकारच्या या निर्बंधाबाबत नेत्यांमधून संंमिश्र प्रतिक्रिया आल्या. मात्र यावर विरोधी पक्षनेेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपली मत व्यक्त करताना लॉकडाऊन मान्य असल्याचं म्हटलं आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आलाय, तो मान्य करावाच लागेल. पण राज्यात पायाभूत सुविधांचा अभाव आहे. राज्यात ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर इंजेक्शन, बेडचा अभाव आहे. त्यामुळे त्या सुविधांमध्ये वाढ करून त्या सुधारल्या पाहिजे, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.  मुंबईतील एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. याआधी देवेंद्र फडणवीस यांनीही अशाच प्रकारचा सल्ला दिला होता.

लॉकडाऊनची घोषणा केली असली तरी सध्याची आरोग्यव्यवस्था सुधारण्याला राज्य सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे. व्हेंटिलेटर्स, रेमडेसिवीर, ऑक्सिजन, ऑक्सिजनेटेड बेड्स तसेच साध्या बेड्सच्या उपलब्धतेकडे प्राधान्याने लक्ष दिलं पाहिजे. तरच रुग्णांची परवड थांबेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, महाराष्ट्रातील ब्रेक द चेन अंतर्गत सरकारने राज्यातील निर्बंध अधिक कडक करून नवीन सुधारित आदेश जारी केले आहेत. नवीन आदेशानुसार नागरिक विनाकारण जिल्ह्याच्या बाहेर किंवा जिल्हा अंतर्गत प्रवास करू शकणार नाहीत. फक्त अत्यावशक काम आणि वैद्यकीय कामासाठीच नागरिकांना घराबाहेर पडता येणार आहे. मुंबईतील लोकलमध्ये फक्त सरकारी कर्मचाऱ्यांना प्रवेश मिळणार आहे

थोडक्यात बातम्या- 

उद्याचा पंतप्रधानांचा पश्चिम बंगाल दौरा रद्द; ऑनलाइन रॅलीचे आयोजन

आज पुण्यात कोरोनाचे किती रुग्ण आढळले?; सर्व आकडेवारी एका क्लिकवर…

खोटे उत्सव आणि रिकामी बडबड नकोय, देशाला उपाययोजना हव्यात- राहुल गांधी

18 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी ‘या’ तारखेपासून सुरू होणार नोंदणी

प्रेयसीला भेटायला जायचं आहे, कोणतं स्टीकर लावू?; तरूणाच्या अजब सवालावर मुबंई पोलिसांचं भन्नाट उत्तर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More