बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…तेव्हा मी आवर्जून देवेंद्रजींकडून डोसे बनवून घेतले”

मुंबई | विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी झी मराठी वाहिनीवरील ‘किचन कल्लाकार’ कार्यक्रमात हजेरी लावली. आपल्या आवाजाने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या मिसेस फडणवीसांनी किचन कल्लाकारच्या मंचावर धमाल केली.

अमृता फडणवीसांनी किचन कल्लाकारच्या मंचावर अनेक धमाल किस्से सांगितले. अमृता फडणवीसांसह देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमात सहभाग घेतला.

सूत्रसंचालक संकर्षण कऱ्हाडेने अमृता फडणवीसांना तुमचा देवेंद्र फडणवीसांच्या हातचा आवडता पदार्थ कोणता?, असा प्रश्न विचारला.यावर, ‘आधी दरवेळेस जेव्हा आमची बाई नाही यायची तेव्हा मी देवेंद्रजींकडून आवर्जून डोसे बनवून घ्यायचे’, असं उत्तर अमृता फडणवीसांनी दिलं.

दरम्यान, तुम्हाला कोणता पदार्थ चांगला बनवता येतो असा प्रश्न संकर्षण कऱ्हाडेने देवेंद्र फडणवीसांना केला. यावर मला चहा, पोहे, डोसा, अंडा करी, ऑम्लेट असे अनेक पदार्थ बनवता येत असल्याचं फडणवीस म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

“बायको हट्टला पेटली तर नवऱ्याने 3 दिवस तिच्यासोबत झोपू नये”

“किरीट सोमय्या म्हणजे राजकारणातील शक्ती कपूर”

सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, पाहा ताजे दर

भरधाव बाईकची ट्रकला धडक; काळजाचा थरकाप उडवणारा अपघात

“भाजपला दूध दिसत नाही, शेण दिसतं, त्यांचा दृष्टीकोनच तसा आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More