महाराष्ट्र मुंबई

अमृता फडणवीसही सोशल मीडिया सोडणार नाही; टाकलं मोदींच्या पावलावर पाऊल!

मुंबई | माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसही सोशल मीडिया सोडणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पावलावर पाऊल टाकत अमृता फडणवीस यांनीही महिलादिनी आपलं सोशल मीडिया अकाऊंट प्रभावी महिलेला वापरण्यास देण्याचा निर्णय घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत सोशल मीडिया सोडण्याचा विचार करत असल्याचं म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली होती. मोदींनी सोशल मीडिया सोडलं तर आम्हीही सोशल मीडिया सोडू, असं भाजपच्या नेत्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी म्हटलं होतं.

अमृता फडणवीस यांनीही अशीच घोषणा केली होती. मात्र आता मोदी आपलं सोशल मीडिया अकाऊंट प्रतिभाशाली महिलांना वापरण्यास देणार असल्याचं समोर आल्यानं अमृता फडणवीस यांनीही तसाच निर्णय घेतला आहे. आपल्या सोशल मीडिया खात्याद्वारेच त्यांनी ही माहिती दिली आहे.

महात्मा गांधी यांचं वचन अमृता फडणवीस यांनी ट्विट केलं आहे. बोलण्याचे स्वातंत्र्य आणि सामाजिक परिवर्तनासाठी गाण्याचे स्वातंत्र्य आणि अंतर्गत शांती हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मला तो मिळेल, असं त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

“कोण अमृता फडणवीस?, त्यांच्यापेक्षा आमच्या आमदाराची बायको जास्त काम करते”

विनायक राऊत म्हणजे कोकणातला कोरोना व्हायरस- निलेश राणे

महत्त्वाच्या बातम्या-

भाजपच्या नगराध्यक्षाला 5 कोटींच्या घोटाळा प्रकरणात अटक

सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या ‘या’ कार्यकर्त्याला राष्ट्रवादी देणार मोठी संधी?

15 ते 20 आमदार संपर्कात; भाजप नेत्याचा धक्कादायक दावा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या