Top News मनोरंजन मुंबई

‘ये नयन डरे डरे’; अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं प्रदर्शित, पाहा व्हीडिओ

Photo Credit- Amruta Fadnavis Youtube Video Screenshot

मुंबई | विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं नवं गाणं प्रदर्शित झालं आहे. ‘ये नैना डरे डरे’ असं या गाण्याचं शिर्षक आहे. अमृता फडणवीस यांनी रविवारी या गाण्याची लिंक त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली आहे.

हे गाणं सारेगामा ग्लोबलची निर्मिती आहे. हे रोमॅन्टीक गाणं असलं तरी मी या गाण्यामध्ये स्वत:चीच व्हॅलेंटाइन असल्याप्रमाणे एन्जॉय केलं. हा अनुभव खूप छान होता, असं ट्विट करत अमृता फडणवीस यांनी हे गाणं शेअर केलं आहे.

हे गाणं प्रदर्शित होण्याच्या तीन दिवस आधीच अमृता यांनी गाण्यामधील काही फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली होती. प्रेम हे जादूच्या सर्वात जवळची गोष्ट आहे. लवकरच आम्ही तुमच्यासाठी नवीन गाणं घेऊन येत आहोत, असं या ट्विटमध्ये अमृता फडणवीस यांनी म्हटलं होतं.

अमृता फडणवीसांच नवीन गाणं समुद्र किनाऱ्यावर चित्रित करण्यात आलं आहे. ये नयन डरे डरे, असं या गाण्याचं नाव आहे. या गाण्याला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे.

थोडक्यात बातम्या-

न्यायव्यवस्था खरंच जीर्ण झालीय का?; शरद पवार म्हणतात…

शेतकरी आंदोलन: देशात असंतोष पसरवण्याचा आरोप, 21 वर्षीय दिशा रवीला अटक

नाद करा पण आमचा कुठं?; दुग्ध व्यवसायासाठी शेतकऱ्यानं हेलिकॉप्टर घेतलं

महाराष्ट्रातील ‘या’ शहरानं रचला इतिहास, पेट्रोलनं शतक ठोकलं!

प्रवासात आजपासून ‘ही’ गोष्ट अनिवार्य, अन्यथा भरावी लागेल दुप्पट रक्कम!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या