मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचं सेल्फीसाठी नसतं धाडस; पोलिस अधिकाऱ्यानं कपाळावर मारला हात

मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सेल्फीसाठी नसतं धाडस केल्याचं समोर आलंय. त्यांच्या या कृत्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.

मुंबई-गोवा क्रूझ सेवेचं आज उद्घाटन करण्यात आलं. यावेळी क्रूझच्या टोकाला बसून सेल्फी काढण्याचा मोह अमृता यांना आवरता आला नाही.

अमृता यांच्या या कृत्यामुळे अधिकाऱ्यांची गाळण उडाली होती. एका पोलिस अघिकाऱ्याने तर चक्क डोक्याला हात मारुन घेतला. हा सारा प्रकार व्हीडिओत कैद झाला आहे. 

दरम्यान, दिवाळीच्या तोंडावर मुंबई-गोवा प्रवासासाठी आजपासून ही क्रूझ पर्यटन सेवा सुरू झालीये. मुंबईच्या भाऊच्या धक्क्यावरुन आंग्रीया ही क्रूझ गोव्याच्या दिशेनं निघालीये.

पाहा व्हीडिओ-

महत्त्वाच्या बातम्या-

-त्या भाजप नगरसेवकाला पोलिस अधिकाऱ्याने धुतलं; नवीन व्हिडिओ व्हायरल  

-राहत्या वार्डात निवडून यायचे यांचे वांदे आणि जगाला सल्ले द्यायचे यांचे धंदे!

-मनसे सारखे पक्ष चिव-चिव, काव-काव करतात, त्यांच्याकडे आम्ही लक्ष देत नाहीत!

-कुस्तीच्या आणि राजकारणाच्या दोन्ही मैदानात उदयनराजेंसोबत लढायला आवडेल!

-राम मंदिराच्या विषयात आम्ही कोर्टालाही मानत नाही- संजय राऊत

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या