महाराष्ट्र मुंबई

…म्हणून मी राजकारणात येण्याच्या योग्यतेची नाही- अमृता फडणवीस

मुंबई | राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नुकतंच ‘मुंबई तक’ला मुलाखत दिली. यावेळी अमृता फडणवीस आम्हाला भविष्यात राजकारणात दिसतील का?, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर मी राजकारणासाठी अनफिट असल्याचं अमृता फडणवीस यांनी सांगितलं.

राजकारणात नसतानाही एवढं ट्रोलिंग होतं आणि मला जे बोलायचंय ते मी बोलते. राजकारणात जाईन तर कशी हालत होईल माझी. मला वाटतं मी सरळ बोलते. मला कोणाची भीती नाहीय. मी माझ्या हिशोबानेच काम करु शकते. त्यामुळे मी राजकारणासाठी अनफिट आहे, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.

साहाजिकपणे आता आम्ही एकमेकांच्या विरोधात आहोत तर शिवसेनेवाले माझी काही स्तृती नाही करणार. त्यामुळे मला जेव्हा काही व्हॅलीड मुद्दे मिळाले की मी ही त्यावर बोलणार, असं अमृता फडणवीसांनी सांगितलं.

आताच्या राजकीय परिस्थितीनुसार आणि संविधानाने दिलेल्या हक्कानुसार बोलणं गरजेचं आहे असं मला वाटतं, असं अमृता फडणवीस यांनी म्हणाल्या.

थोडक्यात बातम्या-

उचलली जीभ आणि लावली टाळ्याला हा भाजपचा एककलमी कार्यक्रम- अशोक चव्हाण

रवी राणांच्या पोषाखावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले संतापले

ग्रामपंचायत निवडणूक पूर्ण ताकदीने लढा, राज ठाकरेंचे जिल्हाध्यक्षांना आदेश

“सरकारी तिजोरी मंत्र्याच्या बंगल्यावर आणि दालनावर रिकामी होत आहे… बेशरम ठाकरे सरकार”

2020 मधील शेवटचं सूर्यग्रहण आज; ‘या’ ठिकाणी पाहता येणार सूर्यग्रहण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या