पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमावर ‘अमूल’च्या 6 संचालकांचा बहिष्कार

अहमदाबाद | मोगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मोदींनी अमूलच्या चॉकलेट प्लांटसह अन्य काही उपक्रमांचं उद्घाटन केलं. अमूलच्या संचालकांनी टाकलेल्या बहिष्कारामुळे हा कार्यक्रम चर्चेत आला आहे. 

अमूल डेअरीचे उपचेअरमन राजेंद्रसिंह परमार यांच्यासह 5 संचालकांनी या कार्यक्रमाला न जाणं पसंत केलं. एका पक्षाने हा कार्यक्रम हायजॅक केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

गेल्या 12 वर्षांपासून मी अमूल डेअरीचा उपचेअरमन आहे. माझे वडीलही उपचेअरमन होते. अनेक पंतप्रधान अमूलच्या कार्यक्रमांना आले, मात्र तो राजकीय कार्यक्रम कधीच झाला नाही. यावेळी एकाच पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण दिलंय. एकाच पक्षाचे झेंडे आणि बॅनर्स झळकत आहेत, असं परमार यांनी म्हटलंय. 

महत्त्वाच्या बातम्या-

-…नाहीतर जनता बंड करेल; शिवसेनेचा भाजपला इशारा

-संभाजी भिडेंसोबत फडणवीस सरकारनं आणखी कुणाविरुद्धचे गुन्हे मागे घेतले?

-मुख्यमंत्र्यांची कृपादृष्टी; संभाजी भिडेंसह अन्य नेत्यांवरील गुन्हे मागे

-एन्काउंटर स्पेशालिस्ट उत्तर प्रदेश पोलिसांना चिमुरडीचं भावनिक आवाहन!

-वर्षात एखादाच जवान मरतो, नुकसान भरपाई वाढवून देऊ; भाजप मंत्र्याचं बेताल वक्तव्य