मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मला मदत करा!, अफगाणी विद्यार्थ्यांची विनवणी!
पुणे | अफगाणिस्तानातील परिस्थिती दिवसागणिक चिघळत चालली आहे. तालिबाननं काबूलसह अफगाणिस्तानातील जवळपास सर्वच भागांवर आपला कब्जा मिळवला आहे. त्यामुळे सध्या तेथील नागरिक पलायन करताना दिसत आहे. अफगाणिस्तान देशातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अशातच आता पुण्यात शिक्षण घेत असलेल्या एका अफगाणिस्तानातील विद्यार्थ्यानं त्याच्या आई-वडिलांच्या सुटकेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मदत मागितली आहे.
पुण्यात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याचं नाव मोहम्मद अहमदी असून तो मुळचा अफगाणिस्तानचा आहे. सध्याची अफगाणिस्तानची परिस्थिती खूप गंभीर असल्यानं तो तिकडे जाऊ शकत नाही. त्यामुळे आई-वडिलांची अफगाणिस्तानातून सुटका करावी म्हणून मोहम्मदनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे विनंती केली आहे.
याविषयी बोलताना मोहम्मदनं म्हटलं की मी गेल्या दहा वर्षापासून पुण्यात राहतोय. मी आता अफगाणिस्तानमध्ये जाऊ शकत नाही कारण तिकडे माझ्या जिवाला धोका आहे. माझ्या आई-वडिलांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार दोन्हीनीही प्रयत्न करावा.
दरम्यान, अफगाणिस्तानमधील सध्याची परिस्थिती खळबळजनक आहे. मी माझ्या आई-वडिलांशी दोन दिवसांपूर्वी बोललो होतो. तेव्हा ते सुरक्षित होते. मी याविषयी मुख्यमंत्र्यांना भेटून विनंती करणार आहे.
थोडक्यात बातम्या –
कोरोना इफेक्ट… HIV बाधितांच्या संख्येबाबत चांगली बातमी आली समोर
कधीकाळी होता कैदेत, आता होऊ शकतो अफगाणिस्तानचा राष्ट्राध्यक्ष
भर सामन्यात बाचाबाची, अन् बाल्कनीत कोहली पेटला; पाहा नेमकं काय झालं?
टाटा मोटर्सचा नवा धमाका, ‘ही’ गाडी तोडू शकते मार्केटचे सर्व रेकॉर्ड्स…
“सचिन वाझे यांच्यासोबत अनिल देशमुखांना एकाच कोठडीत राहावं लागेल”
Comments are closed.