मास्क नाही घातलं म्हणून केली चौकशी, चिडलेल्या महिलेने केली पालिका कर्मचारिकेची पिटाई, पाहा व्हिडीओ
मुंबई | सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा लाॅकडाऊन देखील चालू केलं आहे तर अनेक ठिकाणी संचारबंदी सुद्धा लागू करण्यात आली आहे. कोरोनाचा वाढता धोका पाहून सरकारने अनेक कठोर नियम आणि दंड लागू केले आहेत. यादरम्यान एका महिलेने नियमांचं उल्लंघन केल असून चौकशी केल्यानंतर महिलेने पालिका कर्मचाऱ्याची पिटाई केल्याची घटना समोर आली आहे.
मास्क घालणे तसेच सोशल डिस्टंन्सिंग राखणं अशा सूचना नागरिकांना सतत देण्यात येत आहेत. मात्र लोक कोरोना आणि त्याच्या नियमांना गांभार्याने घेत नसल्याचं व्हायरल झालेल्या व्हिडीओमधून दिसत आहे. मुंबईमध्ये एक महिला विनामास्क फिरत असताना महिला पालिका कर्मचाऱ्याने तिला सवाल केला. या गोष्टीचा महिलेला प्रचंड राग आला असून तिने महिला पालिका कर्मचारिकेला मारायला सुरुवात केली.
मारहाण केल्यानंतर पालिका कर्मचारिकेने चुकीच्या पद्धतीने पकडल्याचा दावा संबंधित महिलेने केला आहे. मात्र व्हिडीओमध्ये पालिका कर्मचारी केवळ महिलेला थांबवताना दिसत आहे. व्हिडीओमधल्या महिलेने पालिका कर्मचारिकेला फक्त मारहाण नाही तर अपमानस्पद शब्द वापरुन शिवीगाळ देखील करताना दिसत आहे.
दरम्यान, घटनास्थळी एका व्यक्तीने या संपुर्ण घटनेचा व्हिडीओ शूट केला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत व्हायरल होत आहे. तसेच महामारी पसरवण्यासाठी व्हिडीओमधील महिल्यांसारखे लोक कारणीभुत आहे, अशा कमेंट्स करण्यात येत आहेत.
मुंबई में महिला को मास्क पहनने को कहा तो हाथापाई शुरू हो गयी। महामारी 😷 फैलने का सबसे बड़ा कारण ऐसे ही लोग है। pic.twitter.com/ZqmfD9gDzz
— Jitender Sharma (@capt_ivane) March 19, 2021
थोडक्यात बातम्या-
‘या’ कारणामुळे 1 एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणं महागणार!
एक दोन नव्हे तर सलग तीन वेळा जो बायडन विमानात चढताना पडले, पाहा व्हिडीओ
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी खूप अभ्यास केलाय; आम्हा डॉक्टरांपेक्षाही त्यांना कोरोनाचं जास्त ज्ञान”
…म्हणून चक्क संजय राठोड यांच्याच गाडीपुढे झोपला युवक!
आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतला पहिलाच चेंडू, अन् दिग्गज आर्चरला ठोकला षटकार; सूर्यकुमार म्हणतो…
Comments are closed.