बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या वृद्ध महिलेनं युवकासाठी सोडला स्वतःचा बेड, म्हणाल्या….

जयपूर | जयपूरमध्ये माणुसकीचं दर्शन घडवणारी घटना घडली आहे. एका वृद्ध महिलेनं युवकासाठी आपला बेड सोडला आहे. युवकाला प्रचंड त्रास होत असल्याचं दिसताच तिनं स्वतः खुर्चीवर बसून ऑक्सिजन घेत तरूणाला बेड दिला. ही घटना राजस्थानच्या पाली येथे घडली आहे.

60 वर्षाच्या महिलेनं केलेल्या या कामाचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. लेहर कंवर असं या वृद्ध महिलेचं नाव आहे. लेहर कंवर यांच्यात कोरोनाची लक्षणं जाणवत होती. यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं. चार तास ओपीडीमध्ये व्हिलचेअरवर बसून वाट पाहिल्यानंतर लेहर यांना बेड मिळाला होता. मात्र गाडीत बसलेल्या तरूणाची अवस्था पाहता त्यांनी लगेच बेड रिकामा केला.

गाडीमध्ये 40 वर्षीय बाबूलाल जीवन आणि मरणाच्या दारात उभा होता. त्याला कोरोनाची लागण झाली होती आणि प्रकृती गंभीर होती. लेहर कंवर यांनी बाबूलालला पाहिल्यानंतर पत्नीला बोलावून घेत संपूर्ण माहिती घेतली. यानंतर लेहर यांनी डॉक्टरांना बोलवत आपला बेड बाबूरामला देण्याची विनंती केली.

मी माझ्या वाट्याचं जीवन जगले. माझ्या मुलांची लग्नदेखील झाली आहे. मात्र, या व्यक्तीची लहान लहान मुलं आहेत. त्यामुळे, त्यांच्यावर उपचार करा. माझा बेड सध्या त्यांना द्या. मी आणखी काही वेळ व्हिलचेअरवरच वाट पाहाते, असं लेहर डॉक्टरांना म्हणाल्याची माहिती आहे.

थोडक्यात बातम्या- 

मराठा उमेदवारांना तात्काळ शासकीय सेवेत सामावून घ्या- खासदार संभाजीराजे

नवविवाहीत नवरीने केलेल्या ‘या’ कृत्याने नवराच नाही तर संपूर्ण सासरवाडीला हादरवून सोडलं!

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारच्या हालचाली सुरू; ‘हा’ महत्वाचा निर्णय घेण्याची शक्यता

इंग्लंडच्या फलंदाजांची झोप उडणार; भारतीय संघात ‘या’ नव्या डावखुऱ्या गोलंदाजाची एन्ट्री

अभिनेत्री कंगणा राणावतला कोरोनाची लागण!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More