बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उद्योगपती आनंद महिंद्रांचं सगळ्यांना प्रेरणा देणारं ट्वीट; ट्वीटमध्ये म्हणतात…

नवी दिल्ली | उद्योगपती आनंद महिंद्रांनी भारतालाच नव्हे तर जगाला प्रेरणा देणारं ट्वीट केलं आहे. त्या ट्वीटचं निमित्त ठरलाय- कोलकाता नाईट रायडर्सचा तुफानी फलंदाज आंद्रे रसेल….

आयुष्यात जिथे अपेक्षा संपलेली असेल तिथे आंद्रे रसेलने खेळलेले 13 बॉल पाहिल, असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. विश्वास आहे तोपर्यंत अपेक्षा संपत नाही, अशी भावना त्यानिमित्ताने त्यांनी व्यक्त केली आहे.

शुक्रवारी बंगळुरू आणि कोलकाता यांच्यात सामना रंगला होता. कोलकात्याने जिंकण्याच्या सर्व अपेक्षा सोडल्या होत्या. मात्र आंद्रे रसेलच्या तुफानी खेळीच्या जोरावर कोलकात्याने बंगळुरूवर थरारक विजय मिळविला. त्याने फक्त 13 चेंडूत 48 धावा फटकावल्या.

थोड्याशा अपयशाने वा संकटाने काही लोकं खचून जातात पण जिद्द ठेवली की सगळं काही शक्य होतं… हीच भावना महिंद्रांच्या ट्वीटमधून व्यक्त होतीय.

महत्वाच्या बातम्या-

-सदाभाऊ खोत राजू शेट्टींवर तुटून पडले; घेतला खरपूस समाचार

-शरद पवार राज ठाकरेंच्या सभेला जाणार नाहीत

-चेन्नईला मोठा धक्का; ‘हा’ महत्त्वाचा खेळाडू राहणार संघाबाहेर

राहुल गांधी यांच्या विरोधात लढणार दोन ‘राहुल गांधी’

-बोलताना जरा मर्यादा राखा… सुषमा स्वराजांनी टोचले राहुल गांधींचे कान!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More