नागपूर | पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे. या अधिवेशनामध्ये राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये आज चक्क तुकाराम महाराजांच्या वेशात दाखल झाले.
प्रकाश गजभिये यांनी तुकाराम महाराजांचा वेश परिधान करून गळ्यात विणा आणि हातात चिपळ्या घातल्या होत्या. तसंच विधानसभेच्या पायऱ्यावर बसून भिडेंच्या वक्तव्याविरोधात निदर्शने केली. तसंच ज्ञानोबा-तुकोबा महाराष्ट्राची शान आहे, त्यांचा अपमान सहन केला जाणार नाही, अशी पोस्टरबाजीही त्यांनी केली.
दरम्यान, गजभियेच्या या वेशाबद्दल विधानसभेत जोरदार चर्चा आहे. मागच्या वेळी ते भिडेंचा वेश परिधान करून हातात आंबे घेऊन विधानसभेत आले होते.
महत्त्वाच्या बातम्या–
-संजय दत्त निरपराध आहे असं बाळासाहेब ठाकरे मला म्हणाले होते- नितीन गडकरी
-विरोधकांनी आम्हाला सल्ले देण्याची गरज नाही- विनोद तावडे
-शिक्षक भरतीबद्दल राज्य सरकारची मोठी घोषणा; दोन महिन्यांत 18 हजार शिक्षकांची भरती
-मुख्यमंत्री असतांना पृथ्वीराज चव्हाण झोपले होते का?- अतुल भोसले
-थापा मारून राज्य आणायचं म्हणजेच चाणक्य नीती का? उद्धव ठाकरेंचा सवाल
Comments are closed.