बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! कल्याणमध्ये शिक्षकाने 8 वर्षाच्या चिमुकलीवर केला लैंगिक अत्याचार

ठाणे | गेल्या काही वर्षांपासून महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अलिकडेच डोंबिवलीत अल्पवयीन मुलींवर बलात्काराची घटना घडली होती. त्यानंतर लगेचच आता कल्याणमध्ये एका शिकवणी चालवणाऱ्या शिक्षकाने 8 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाबाबत पीडितेच्या आईने बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

कल्याणच्या एका सोसायटीत राहणारी आठ वर्षीय चिमकुली एका शिक्षिकाकडे शिकवणी घेण्यासाठी जात होती. काही दिवसांपूर्वी शिक्षिका माहेरी गेल्यामुळे शिक्षिकेचा पती मुदर तालवाला हा मुलांची शिकवणी घेत होता. पीडितेच्या आईने पीडित चिमुकलीला शिकवणीसाठी जायला सांगितल्यावर ती रडायला लागली. त्यानंतर चिमुकलीने घडलेला सर्व प्रकार तिच्या आईला सांगितला.

पीडित मुलींच्या आईने 42 वर्षीय शिक्षक मुदर तालवाला यांच्याविरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केलं आणि एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. याप्रकरणाची माहिती बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र अहिरे यांनी दिली.

दरम्यान, राज्यात महिलांच्या अत्याचारांसंदर्भात शक्ती कायदा अंमलात आणला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील सांगितलं आहे की, शक्ती कायदा अजून मजबूत करून आरोपींना कठोर शिक्षा केली जाईल. परंतु गेल्या काही वर्षापासून महिलांच्या अशा घटना वाढताना दिसत आहे. त्यामुळे समाजातील सगळ्या स्तरातून या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे.

थोडक्यात बातम्या-

“किरीट सोमय्यांनी शरद पवारांवरील आरोप थांबवावे, नाहीतर…”

काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद रणपिसे यांची प्राणज्योत मालवली, उद्या होणार अंत्यसंस्कार

”हा’ आजार दूर करण्यासाठी मद्यपान कर आणि शरीरसंबंध ठेव’; मुंबईच्या डॉक्टरचा मुलीला अजब सल्ला 

बाबो! रद्द झालेल्या न्युझीलंड दौऱ्यातील पाकिस्तानच्या सुरक्षा पोलिसांनी ‘इतक्या’ लाखांची बिर्याणी केली फस्त

घरगुुती गॅस सिलेंडरच्या सबसिडीबाबत केंद्र सरकार ‘हा’ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More