मुंबई | गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. गृहमंत्र्यांनी स्वत: याबाबत माहिती दिली आहे.
अनिल देशमुख यांनी संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोनाची चाचणी करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.
आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असं मी आवाहन करतो. लवकरच मी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईल, असं अनिल देशमुख म्हणाले.
दरम्यान, अनिल देशमुख गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी राज्यातील विविध भागांच्या दौऱ्यावर होते.
आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे मी आवाहन करतो. लवकरच मी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईल.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) February 5, 2021
थोडक्यात बातम्या-
‘या’ माजी आमदाराचा भाजपला रामराम, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश
‘फासा आम्हीच पलटणार’; देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य
‘सर्वांना मोफत कोरोना लस देणार’; ‘या’ सरकारने केली मोठी घोषणा
जिथे खिळे ठोकले, तिथे फुलं लावणार; राकेश टिकैत यांची घोषणा
आमचं चुकलं असेल तर माफ करा, पण…- नितीन राऊत