बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘शरद पवारांची मनधरणी करण्यासाठी अनिल देशमुखांनी 2 कोटी रुपये मागितले’; सचिन वाझेंचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई | मनसुख हिरेन हत्याप्रकरण आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं ठेवल्याप्रकरणी राष्ट्रीय यंत्रणेच्या ताब्यात असलेले सचिन वाझे यांनी आता मोठा गौप्यस्फोट केला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर आता अनिल देशमुखांवर सचिन वाझे यांनीही मोठा आरोप केला आहे.

सचिन वाझे यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेला एक पत्र लिहून अनिल देशमुख यांनी 2 कोटी रुपये खंडणी मागितली होती. असा खळबळजनक आरोप केला आहे. या सर्व प्रकरणामुळे आता अनिल देशमुख यांच्या अडचणीत मोठी वाढ होणार असल्याचं पाहायला मिळत आहे.

परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बनंतर आता निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने ही लेटर लिहून अनिल देशमुखांवर आरोप केला. ‘माझ्या नियुक्तीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोध केला होता आणि ते मला पदावर ठेवण्यास इच्छुक नव्हते, त्यांचं मत बदलण्यासाठी अनिल देशमुख यांनी मला 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती’, असा आरोप सचिन वाझेनी केला आहे.

निलंबित पोलिस अधिकाऱ्याने केलेल्या या आरोपानंतर अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. सध्या अनिल देशमुखांवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाचा तपास मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर अनिल देशमुख यांनी आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला. आता या प्रकरणात आणखी किती गोष्टींचा खुलासा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

थोडक्यात बातम्या

महेंद्रसिंग धोनीचे ‘सुपर किंग्स’ यंदाही प्ले ऑफसाठी पात्र ठरणार नाहीत; ‘या’ माजी क्रिकेटपटूचा दावा

पैशांच्या अडचणीमुळे वडिलांनी चक्क आपल्या मुलीलाच विकलं अन्…

कोरोना संकटातून वाचण्यासाठी पुणे प्रशासनानं लष्कराकडे केली ‘ही’ मागणी!

भाऊंचा नवा व्हिडीओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ, पाहाल तर खळखळून हसाल

पत्रकाराचं अपहरण करून निर्घृण हत्या; अहमदनगरच्या घटनेनं महाराष्ट्र हळहळला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More