बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सचिन वाझेच्या पुनर्नियुक्तीशी अनिल देशमुख यांचा थेट संबंध नाही”

मुंबई | सचिन वाझेच्या पुनर्नियुक्तीबाबत गृहमंत्र्यांना पूर्ण कल्पना होती, त्यांचीही त्याला मंजुरी होती. सीबीआयचा एफआयआरमधील हा उल्लेख चुकीचा असल्याचं अनिल देशमुख यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयाला सांगितलं आहे. देशमुख यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी उच्च न्यायालयात युक्तिवाद केला.

उच्च न्यायालयाने सीबीआयला प्राथमिक चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर सीबीआयने गुन्हा दाखल केला. ताे रद्द करण्यासाठी देशमुख यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. सुनावणी न्या. एस. एस. शिंदे व न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठापुढे होती.

सिंग यांच्या पत्रामुळे फारतर संशय निर्माण झाला असता किंवा आयुक्तांच्या कार्यालयात कुजबुज झाली असती; पण याची चौकशी होऊ शकत नाही. देशमुख यांच्या विरोधात कोणतेही पुरावे नसताना त्यांना सीबीआय चौकशीला सामोरं जावं लागलं म्हणून ते जाहीरपणे लज्जीत झाले. एकही व्यक्ती पुढे येऊन म्हणाली नाही की, आपल्याकडून पैसे मागण्यात आले. या प्रकरणात कोणीही पीडित नाही, असा युक्तिवाद अमित देसाई यांनी केला.

दरम्यान, पुनर्नियुक्तीत देशमुख यांचा थेट संबंध नाही. सिंग आणि दोन आयुक्तांच्या समितीने तो निर्णय घेतला आहे, असंही अमित देसाई यांनी स्पष्ट केलं. आता या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी ठेवण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘इंधन दरवाढीसाठी काँग्रेस जबाबदार’; पेट्रोलियम मंत्र्यांचा गंभीर आरोप

कडक सॅल्युट! बोट तुटलं तरीही ‘तो’ सामना खेळायला मैदानात उतरला

ओबीसी आरक्षण रद्द होण्यास भाजप सरकार जबाबदार – नाना पटोले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून 24 तासांत जितेंद्र आव्हाडांची नाराजी दूर; काढला हा तोडगा

उंदराने डोळे कुरतडलेल्या 24 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू!

 

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More