मनोरंजन

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुलाचा जिल्हा परिषद निवडणुकीत दमदार विजय!

नागपूर | गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले सलील देशमुख नागपुरातील मेटपांजरा येथून विजयी झाले आहेत.

नागपूर जिल्हा परिषद सदस्य म्हणून सलील देशमुख पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. सलील देशमुख हे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून राष्ट्रवादीत सक्रिय आहेत. अनिल देशमुख यांनी याआधीही मुलासाठी विधानसभा निवडणुकीचं तिकीट मागितलं आहे.

Loading...

पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघासाठी अनिल देशमुख आग्रही होते. पण विधानसभेची संधी हुकलेल्या सलील देशमुखांना जिल्हा परिषदेत यश मिळालं आहे.

दरम्यान,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनाही धक्का बसला आहे. नितीन गडकरींचं मूळ गाव असलेल्या धापेवाडा आणि बावनकुळेंचं मूळ गाव कोराडीमध्ये भाजपला पराभवाला सामोरं जावं लागलं.

Loading...

ट्रेंडिग बातम्या-

“लोकशाहीच्या मंदिरात येण्याची संधी न मिळणाऱ्यांसाठी राजकीय आरक्षण आवश्यक”

गडकरी-बावनकुळेंच्या मूळगावीच भाजपला धक्का!

…म्हणून मी जेएनयूमध्ये गेले; दीपिका पादुकोणची प्रतिक्रिया

Loading...

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

 

 

Loading...

ताज्या बातम्या