नागपूर महाराष्ट्र

पूजा चव्हाण प्रकरणावर अनिल देशमुखांनी सोडलं मौन, म्हणाले…

Photo Credit- Facebook/ Pooja Chavhan & Anil Deshmukh

नागपूर | पूजा चव्हाण या तरुणीने 7 फेब्रुवारीला आत्महत्या केली होती. ती स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी भावासोबत पुण्यात राहत होती. या प्रकरणावरून सध्या राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे.

या प्रकरणी भाजपने शिवसेना नेते आणि मंत्री संजय राठोड यांचं नाव घेत त्यांच्यावर धक्कादायक आरोप केले आहेत. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी भाजपने केली आहे. याप्रकरणावर आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मौन सोडलं आहे.

पूजा चव्हाण प्रकरणी विरोधक करत असलेला आरोप चुकीचा आहे. वन मंत्री संजय राठोड यांची नियमानुसार चौकशी करण्यात येईल, असं अनिल देशमुखांनी म्हटलं आहे. ते नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

पूजा चव्हाण प्रकरणात पुणे पोलिसांवर कोणताही दबाव नाही. पोलीस चांगला तपास करत आहेत. पोलिसांवर दबाव असलेला विरोधकांचा आरोप चुकीचा आहे. त्यात काहीच तथ्य नाही. चौकशी अहवाल आल्यावर सत्य निष्पन्न होईल, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं. तसेच राठोड यांची नियमानुसार चौकशी केली जाईल. चौकशीचा अहवाल आल्यानंतर राज्य सरकार याबाबत निर्णय घेईल, असं अनिल देशमुख म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

…नाहीतर शरद पवारांची जीभ घसरली असेल- राम शिंदे

21 वर्षीय दिशाला का केली अटक?; नेमके काय आहे टूलकिट प्रकरण?

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे ‘या’ आमदाराला येत आहेत धमक्यांचे फोन!

डीजीपींनी नोकरी सोडत घेतला शेती करण्याचा निर्णय

आता मनसेच्या अमित ठाकरेंचीही शिवसेनेवर टीका, म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या